Success Stories

रणजीत यांनी सुमारे २० वर्षे वेगवेगळ्या चहा कंपन्यांमध्ये काम केले व त्या अनुभवानंतर त्यांनी 'अरोमिका टी' नावाचा आसाम टी स्टार्टअप व्यवसाय सुरू केला.

Updated on 01 May, 2022 4:04 PM IST

असं म्हणतात की जर एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी कठोर परिश्रम घेत असेल तर ती व्यक्ती लवकरच त्याच्या ध्येयापर्यंत पोहचते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका संघर्षाबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर नवीन यश मिळवले आहे. 44 वर्षीय रणजीत बरुआ हे मूळचे आसाममध्ये राहणारे. त्यांना चहाची इतकी आवड आहे की, त्यांना कुणी विचारलं की तुझं आयुष्य कसं आहे, तर ते चहाचं आयुष्य म्हणून सांगतात.

रणजीत यांनी सुमारे २० वर्षे वेगवेगळ्या चहा कंपन्यांमध्ये काम केले व त्या अनुभवानंतर त्यांनी 'अरोमिका टी' नावाचा आसाम टी स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. रणजीतचा हा व्यवसाय सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे चहाला आरोग्याची जोड देणे आणि जास्तीत जास्त लोकांना उत्तम चहाची चव चाखवणे हा आहे. रणजीतच्या या विदेशी चहाच्या ग्रुपने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय रणजीत हे लोकांसाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व बनले आहेत.

रणजीतने यापूर्वीही चहाबाबत असाच प्रयोग केला होता. त्यातूनही त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. रणजीत त्याच्या चहासाठी जगभर ओळखला जातो.काही काळापूर्वी रणजीतने तयार केलेला मिरचीचा स्वाद असलेला चहा अनेकांना आवडला होता आणि त्याचवेळी लोकांनी हा चहा देशात खूप प्रसिद्ध केला होता. रणजीतने हा चहा जगातील सर्वात हॉट चिली चहामध्ये मिसळून तयार केला आहे. सध्या, ते त्यांच्या मिश्रित चहाची चव 10 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरवण्याचे काम करत आहेत. जगभर प्रसिद्ध असलेल्या या चहामुळे रणजित यांना महिन्याला विदेशातून चहाच्या अधिक ऑर्डर मिळतात.

चहासोबतच आणखी एक नवखा प्रयोग रणजीतने केला आहे. रणजीतने 'रोंगली' चहा नावाचा इको फ्रेंडली टी पॅकही तयार केला आहे. या कागदाचा वापर केल्यानंतर तो मातीत टाकला असता त्या मातीत रोप वाढू लागते. पर्यावरणाचे भान ठेवून रणजितने समाजात आनंद आणि हिरवाई पसरवण्यासाठी हे पॅकेजिंग सुरू केले आहे. जेणेकरुन लोक कमी वेळेत सहजपणे आपल्या घरात रोपे वाढवू शकतील. रणजित यांना 'इको-फ्रेंडली टी पॅक'साठी लोकांकडून विशेषतः शाळकरी मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळला.

सध्या बाजारात 100 ग्रॅम चहाच्या इको-फ्रेंडली पॅकेजिंगची किंमत सुमारे 300 रुपये आहे. रणजीतने सुमारे 20 लाख रुपये खर्च करून हा व्यवसाय सुरू केला आणि आजच्या काळात त्यांच्याकडे 50 हून अधिक लोक काम करतात, ज्यात बहुतांश महिला काम करतात. सध्या रणजीतची कंपनी ४२ प्रकारचे चहा तयार करून विकत आहे. आगामी काळात रणजित 'गोल्ड ब्लेंड' चहा करणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
याला म्हणतात जिद्द!! वडील मजूर, स्वतः भाजीपाला विकला; नऊ वेळा अयशस्वी तरी देखील न खचता शेवटी जज बनलाच 
Farming Business Idea : कधीही करा या फळाची शेती आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी सविस्तर 
Breaking: आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे दर वाढले; देशात 'या' खताची टंचाई भासू लागली

English Summary: So much for listening! This eco-friendly 'eco-friendly tea pack' will now grow into a tea plant.
Published on: 01 May 2022, 04:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)