सध्याच्या परिस्थिती मध्ये शेती करण्यासाठी आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण तसेच रासायनिक खतांचा यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याशिवाय शेतीमधून चांगले उत्पन्न आपल्याला मिळू शकत नाही. पारंपरिक पद्धतीने शेती करून मिळणाऱ्या उत्पादनात शेतकरी वर्ग संतुष्ट होत नाही त्यामुळे शेतकरी वर्गाने सुद्धा आधुनिकता यांत्रिकीकरण आणि रासायनिक खतांचा वापर करून आपले उत्पन्न वाढवू लागला आहे.
आधुनिकता आणि यांत्रिकीकरणांची गरज:-
सध्या च्या युगात शेतकरी वर्ग रब्बी आणि खरीप पिकांची टाळाटाळ करून फळबागा आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवून भरघोस नफा मिळवत आहेत. पुण्यातील सीमा जाधव या स्त्री ने चक्क आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये 18 जातीच्या वेगवेगळ्या देशी आणि विदेशी भाजीपाल्यांची लागवड केली आहे. आणि यातून त्या बक्कळ नफा सुद्धा मिळवत आहेत. सीमा जाधव या सुरवातीच्या काळात दूरदर्शन परदेशी वर भाजीपाल्यांची शेती या विषयी कार्यक्रम बघत असायच्या आणि शेतीमध्ये कोणकोणते बदल करता येतील यावर विचार करायच्या.
सीमा जाधव यांच्या खडतर प्रवास:-
2002 साली त्यांनी या कार्यक्रमाच्या आधारे शेतामध्ये भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. यामध्ये देशी आणि विदेशी अश्या दोन्ही प्रकारच्या भाजीपाल्याचा समावेश होता. सुरवातीच्या काळात सीमा जाधव आपल्या शेतात टोमॅटो, वांगी,काकडी अश्या देशी भाजीपाल्याची लागवड करत असायच्या परंतु त्या वेळी भोसरी बाजारात त्या मालाला योग्य भाव मिळत न्हवता. निघणारे उत्पन्न हे अडत, हमाली , आणि खर्च जाऊन हाती काहीच शिल्लक राहत न्हवते. 2004 साली सीमा यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये देशी आणि विदेशी भाजीपाल्याची लागवड केली. या मध्ये त्यांनी 18 जातीच्या विविध भाजीपाल्याची लागवड केली आहे. तसेच त्यांनी आपल्या शेतामध्ये ब्रोकोली चे सुद्धा उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या ब्रोकोली ला बाजारात 300 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे तसेच यातून त्या बक्कळ नफा मिळवत आहेत.
बारमाही उत्पन्न आणि नफा:-
सीमा जाधव यांच्या शेतात 12 महिने भाजीपाला पिकतो. एका पिकाचा बहार संपण्याच्या आधी दुसऱ्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. योग्य नियोजन आधुनिकरण करून कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळवू शकतो. तसेच बाजारात देशी आणि विदेशी भाजीपाल्याला मोठया प्रमाणात मागणी असल्यामुळे विक्री मोठ्या प्रमाणात होते आहे. त्यामुळे त्यां भाजीपाला विक्री करून बक्कळ पैसे कमवत आहेत.
Published on: 14 December 2021, 05:03 IST