Success Stories

देशात सर्वत्र शेतकरी बांधव पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरून शेती करताना बघायला मिळत आहेत यामुळे शेतकरी बांधवांना फायदा देखील होत आहे. मात्र असे असले तरी, सारंखेडा येथील शेतकरी सरपंचांने एक नाविन्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे.

Updated on 07 March, 2022 3:36 PM IST

देशात सर्वत्र शेतकरी बांधव पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरून शेती करताना बघायला मिळत आहेत यामुळे शेतकरी बांधवांना फायदा देखील होत आहे. मात्र असे असले तरी, सारंखेडा येथील शेतकरी सरपंचांने एक नाविन्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे.

या शेतकऱ्याने पारंपारिक शेती पद्धतीतून देखील लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते असे दाखवून दिले आहे. सारंखेडाचे सरपंच पृथ्वीराजसिंग रावल यांनी आपल्या सहा एकर शेतजमिनीत सोयाबीनची लागवड केली होती. या एवढ्या मोठ्या क्षेत्रातून सोयाबीनची काढणी झाल्यानंतर लबाड सोयाबीनची मोठ्या प्रमाणात उगवण झाली. या लबाड सोयाबीन पासून सरपंचांनी तब्बल तीस क्विंटल उत्पादन प्राप्त केले. या एवढ्या मोठ्या उत्पादनातून त्यांना दोन लाख रुपये प्राप्त झाले.

पृथ्वीराज सिंग यांनी बियाण्यांसाठी येणारा हजार रुपयांचा खर्च वगळून पारंपारिक पद्धतीने निसर्गतः उगवलेले लबाड सोयाबीन जोपासून लाखो रुपयांची कमाई काढल्याने त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे. रावल यांनी सांगितले की, पारंपारिक पद्धतीने शेती केली तरी लाखो रुपयांचे उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. रावल यांनी खरिपात सोयाबीन ची लागवड केली होती, खरीप हंगामातील सोयाबीन काढणी झाल्यानंतर त्यांनी ऊस लागवडीकडे आपला मोर्चा वळवला. 

या ऊसातच आधीच्या हंगामात घेतलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवू लागले. रावलं यांनी देखील हे लबाड सोयाबीन उगूच दिले. रावलं यांना या लबाड सोयाबीन पिकातून 30 क्विंटल उत्पादन मिळाले यातून 2 लाख 25 हजार रुपयांची कमाई झाली. खरीप हंगामात देखील त्यांना या सहा एकर क्षेत्रातून दोन लाख 25 हजार रुपयांची कमाई झाली होती. एकंदरीत या सहा एकर क्षेत्रातून सोयाबीन पिकातून चार लाख 50 हजार रुपयांची कमाई झाली.

English Summary: sarpanch earn 2 lakh from fake soybean crop
Published on: 07 March 2022, 03:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)