Success Stories

रुद्राक्ष म्हटले म्हणजे अतिशय दुर्मिळ असे फळ आहे. त्यासोबतच भारतीय धार्मिक परंपरेत रुद्राक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याची एक स्वतंत्र ओळख आहे. जर आपण रुद्राक्ष विषयी पाहायला गेले तर ही भारताच्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश या भागात आढळून येते

Updated on 11 March, 2022 12:51 PM IST

रुद्राक्ष म्हटले म्हणजे अतिशय दुर्मिळ असे फळ आहे. त्यासोबतच भारतीय धार्मिक परंपरेत रुद्राक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याची एक स्वतंत्र ओळख आहे. जर आपण रुद्राक्ष विषयी पाहायला गेले तर ही भारताच्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश या भागात आढळून येते

तसेच नेपाळ आणि बाली येथेदेखील आढळते. परंतु दुर्मिळ अशा या रुद्राक्षाचे लागवड साताऱ्यातील नर्सरी उद्योग करणाऱ्या शरद आणि विद्या देगावकर यांनी यशस्वी करून दाखवली. याबाबत सविस्तर माहिती अशी की,देगावकर यांना वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवडीचे आवड आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या गच्चीवर अनेक दुर्मिळ असे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष तसेच वनस्पती यांची लागवड केली आहे. ही लागवड करताना त्यांनी थोडासा ग्रीन हाऊस टच देखील दिला आहे. आजच्या सहा वर्षांपूर्वी त्यांनी तीन मुखी रुद्राक्ष या फळाचे झाड आणून लावले. आता या झाडाला पंचवीस फळे लागली असून आता चांगलेच बहरले आहे.हे रुद्राक्षाचे झाड पाहण्यासाठी आजपर्यंत परिसरातील अनेक लोकांनीयेथे भेट दिली आहे. या झाडाची उंची आता चार ते साडेचार फूट आहे. जेव्हा हे झाड सहा वर्षांपूर्वी लागवड केले होते तेव्हा पहिल्यांदा त्याला फक्त दोन फळे लागली होती.

परंतु आता याला पंचवीस फळे लागली असून सुरुवातीच्या दोन फळांमध्ये दोन मुखी आणि तीन मुखी रुद्राक्ष होते. जर एक मुखी रुद्राक्ष शोधायचा राहिला म्हणजे लाखात एक सापडतो. रुद्राक्षाचे सुकलेले फळ फोडल्यानंतर त्याच्यामधून अखंड रुद्राक्ष मिळतो.गायीच्या तुपामध्ये थोडावेळ ठेवल्या नंतर त्याला चांगला रंग येतो. सहा-सात वर्षापूर्वी अनेक साताऱ्यातील लोकांनी रोपे खरेदी केली. अनेकांच्या शेतीमधील रुद्राक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला पण त्याला पाहिजे अशी फळधारणा झाली नाही.

 रुद्राक्षाचे महत्त्व

रुद्राक्ष हे एक झाडाचे फळ आहे. याचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयीन परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. यावृक्षाच्या फळांना रुद्राक्ष असे म्हणतात. झाडावर जेव्हा हे फळ असते तेव्हा त्याच्यावर कवच असते. ते काढल्यानंतर आता जे बीज मिळते तो रुद्राक्ष असतो. रुद्राक्षाला अंगचे छिद्र असते, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे लागते व आतल्या काड्या वगैरे काढावे लागतात. 

आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आमल,उष्ण वीर्या व आयु कफनाशक आहे.याचा ब्लडप्रेशर च्या रुग्णाला उपयोग होतो असे म्हणतात. रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडी भरून पाणी घालावयाचे  आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात. योगी लोकांच्या मध्ये प्राणतत्त्व नियमन करणारी शक्ती रुद्राक्षमध्येअसते. रुद्राक्ष माळेने मंत्र साधकाला मनशक्ती वर नियंत्रण मिळवता येते.

English Summary: rudraksh cultivation is succesful in satara district and know important of rudraksh
Published on: 11 March 2022, 12:51 IST