मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे सांगितले जाते. निश्चितच अपयशातून यशाचा सुंदर असा मार्ग मोकळा होत असतो. कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी अपयश पचवण्याची शक्ती असणे अतिशय महत्त्वाचे असते. अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या बाबतीत देखील काहीसं असंच घडल आहे.
जिल्ह्यातील पातुर येथील एका शेतकऱ्याला कोरोना काळात शेतीत मोठे नुकसान सहन करावे लागले होते. मात्र यावर्षी काळ्या आईने या शेतकऱ्याला भरभरून असे धन दिले आहे. कोरोना काळात लिंबाला चांगली बाजारपेठ मिळाली नसल्याने अकोला येथील एका शेतकऱ्याला हजारो रुपयांचा फटका बसला होता.
मात्र यावर्षी लिंबाला चांगली मागणी असल्याने आणि अपेक्षित असा दर मिळत असल्याने या शेतकऱ्याला लिंबाच्या शेतीतून लाखों रुपयांची कमाई झाली आहे. एकंदरीत काय अपयश आले म्हणून खचून न जाता प्रयत्न करत राहिल्यास यशाला निश्चितच गवसणी घालता येते हे या शेतकर्याने दाखवून दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
दीड एकरात फुलवला सूर्यफूलचा मळा आणि एकाच वर्षात बनला लखपती; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा
मित्रांनो 2020 मध्ये कोरोना नामक महामारी संपूर्ण जगात थैमान घालत होती. यामुळे उद्योगधंद्यांपासून ते शेती पर्यंत सर्व व्यवसायास मोठा फटका बसला होता. 2020 मध्ये या संकटामुळे लिंबू पिकाला बाजारपेठ मिळाली नाही. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिस्थिती एवढी बिकट बनली होती की लिंबाची काढणी देखील त्या वेळी शेतकऱ्यांना करता आली नाही. यामुळे सोन्यासारखे लिंबाचे पिक झाडावरच सडून जात होते.
याचा फटका लातूर जिल्ह्यातील पातुर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेतकरी रमेश जनार्दन काळबांडे यांनादेखील बसला होता आणि त्यांना तब्बल पाच लाखांचे नुकसान सहन करावे लागले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लिंबाच्या शेतीकडे पाठ देखील फिरवली मात्र हाडाचे शिक्षक असलेले शेतकरी रमेश जनार्दन काळबांडे यांनी अपयशापुढे खचून न जाता पुन्हा एकदा जिद्दीने लिंबाची शेती सुरू केली. शेवटी काळबांडे यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला.
जो नींबू कोरोणा काळात एक रुपये दराने विकला जात होता तो नींबू आता दहा रुपये प्रति नग या दराने विक्री होत आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यात लिंबाला चांगली मागणी असून अपेक्षित असा दर मिळत असल्याने काळबांडे यांना मोठा फायदा झाला आहे. काळबांडे यांनी उत्पादित केलेल्या लिंबू या शेतमालातुन त्यांना अवघ्या सहा दिवसात 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काळबांडे यांनी 28 वर्षांपूर्वी लिंबाची पारंपारिक पद्धतीने शेती सुरू केली. त्यांच्याकडे वडिलोपार्जित साडेतीन एकर शेतजमीन होती. शेत जमीन कोरडवाहू होती यामुळे त्यांनी आपल्या अपार कष्टाने त्या कोरडवाहू शेतजमिनीला बागायती शेतजमिनी सारखे सुजलाम सुफलाम केले आहे. सद्यस्थितीला त्यांच्या शेतात 300 लिंबाची झाडे आहेत. आणि यातून त्यांना यावर्षी चांगली कमाई देखील झाली आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाळा हा खुपच कमी असतो शिवाय कोरडवाहू शेती असल्याने ही झाडे जगवायची कशी, हा मोठा प्रश्न गुरुजींना पडला होता. मात्र गुरुजींनी एक नामी शक्कल लढवत कुंभाराकडून मडकी आणली. हे मडके प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी ठेवून ठिबक सिंचनसारखे दोन वर्षे झाडे जगवली. या नवीन प्रयोगामुळे शेतातील पिके कमी पावसात देखील अधिक उत्पादन देण्यासाठी सज्ज झाली आहेत. निश्चितच गुरुजींचा हा प्रयोग विपरीत परिस्थितीवर कशा पद्धतीने मात केली जाऊ शकते हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे.
Published on: 10 May 2022, 02:26 IST