Success Stories

म्हणतात ना शेती करणारे व्यक्ती हे निसर्गाच्या अगदी जवळ असतात खानिजे निसर्गाच्या जवळ असतात ते ईश्वराच्या जवळ असतात. काहीसे असेच आदर्श म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे काम बिहार पटना पासून जवळ असलेल्या खुसरुपुरच्या बैकटपुर गावात राहणाऱ्या राजेश कुमार सिन्हा यांच्याबद्दल सांगता येईल.

Updated on 17 December, 2021 4:53 PM IST

म्हणतात ना शेती करणारे व्यक्ती हे निसर्गाच्या अगदी जवळ असतात खानिजे निसर्गाच्या जवळ असतात ते ईश्वराच्या जवळ असतात. काहीसे असेच  आदर्श म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे काम बिहार पटना पासून जवळ असलेल्या खुसरुपुरच्या बैकटपुर गावात राहणाऱ्या राजेश कुमार सिन्हायांच्याबद्दल सांगता येईल.

राजेश अगोदर मुंबई येथे 80000 प्रतिमहा पगार असलेल्या नोकरीला होते.  परंतु 2020 मध्ये त्यांचे आईचे निधन झाल्यानंतर ते त्यांच्या वडिलांना घेवून त्यांच्या गावी परत आलेआणि शेती करणे सुरू केले.राजेश यांचे शेती करण्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते ऑरगॅनिक शेती म्हणजे काय जैविक शेती करतात. शेतीच्या माध्यमातून ते महिन्याला 14 ते 15 लाख रुपये कमवीत आहेत. राजेश यांच्याकडे पाच एकर शेती असून  याषद तिथे खताच्या रूपातजैविक खताचा वापर करतात जसे की शेणखत,काडीकचरा,स्वयंपाक घरातील वेस्टेज,गुळ इत्यादींचा वापर ते पिकांसाठी करतात.ते एका प्रकारेनैसर्गिक साधनांचा वापर करून इको फ्रेंडलीशेती करीत आहेत. त्यामुळे ते इतर शेतक-यांच्या देखील आदर्श बनले आहेत.

शेतीसोबत पशुपालन सुद्धा आहे गरजेचे..

 राजेश सिन्हा है शेतीसोबतच मत्स्यपालन,बदक पालन सुद्धा करतात. तसेच शेती सोबत पशुपालन करणे सुद्धा चांगले मानले जाते.मासे आणि बदक पाण्यात राहणारे असल्यामुळेहे दोन्ही प्राणी पाण्यात राहू शकल्यामुळे जागेची देखील बचत होते.

 औषधी वनस्पतींचे लागवड आहे फायद्याची..

 राजेश एवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी औषधी वनस्पती यांचे सदा लागवड केली आहे ज्यामध्ये कोरफड, तुळसी तसेच काही मसाल्याचे पदार्थ यांचादेखील समावेश आहे. त्याविषयी बोलताना राजेश सांगतात की औषधी वनस्पतींच्या लागवडीतून त्यांना चांगला नफा मिळतो.

 शेती साठी जैविक कीटकनाशकांचा करतात वापर

राजेश हे इतर पिकांसोबत काळागहू आणि फुलांची सुद्धा शेती करतात.ज्या माध्यमातून त्यांना चांगले नफा प्राप्त होत आहे.या सगळ्यात पिकांना ते ऑरगॅनिक कीटकनाशकांचा फवारा करतात.यासाठी ते गोमूत्र आणिनीम अर्काचा वापर करतात.

 इच्छा असेल तर मार्ग सापडतो..

या बाबतीत बोलताना राजेश म्हणतात की,मुंबईमध्ये एम्ब्रोईडरी चे काम करत होते,परंतु त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतरगावी येऊन ते शेती करायलालागले. ज्या माध्यमातून ते खूप समाधानी आहेत.त्यांच्या सगळ्या यशामागेयुट्युब चा फार मोठा हात आहे.याबाबतीत राजेश सांगतात की ऑरगॅनिक फार्मिंगविषय ची सगळी माहिती त्यांनी युट्युबच्यामाध्यमातून घेतली.

English Summary: releave 80 thousand sallary job and develope carrear in agriculture and earn more money
Published on: 17 December 2021, 04:53 IST