Success Stories

अनेक शेतकरी सध्या पारंपरिक शेतीला फाटा देत व्यवसाईक शेतीकडे वळाले आहेत. यामधून त्यांना चांगले पैसे देखील मिळत आहेत. शेतीला व्यवसायाची जोड असल्यास ती शेती हमखास परवडते असे म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे.

Updated on 05 February, 2022 11:09 AM IST

अनेक शेतकरी सध्या पारंपरिक शेतीला फाटा देत व्यवसाईक शेतीकडे वळाले आहेत. यामधून त्यांना चांगले पैसे देखील मिळत आहेत. शेतीला व्यवसायाची जोड असल्यास ती शेती हमखास परवडते असे म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे. आता पुणे जिल्ह्यात मांडवगण फराटा येथील महादेव व सागर या फराटे पितापुत्रांनी सेंद्रिय पद्धतीने ऊस उत्पादन व त्याच पद्धतीने गूळ तयार करून राजविजय हा त्याचा ब्रॅण्ड तयार केला आहे. आता यामधून त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. परिसरात भीमा नदी असल्याने येथे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.

येथे फराटे या पितापुत्रांनी सेंद्रिय ऊस व गूळनिर्मितीत चांगला जम बसवला आहे. त्यांनी गेल्या सहा ते सात वर्षांपासून यामध्ये काम सुरु ठेवले आहे. त्यांचा १० एकर ऊस आहे. सुरुवातीला त्यांनी आपला ऊस कारखान्याला दिला. त्यानंतर मात्र गूळनिर्मितीत उतरण्याचे ठरविले. गूळ सेंद्रिय बनवताना आधी उसशेतीचे नियोजन केले. तागासारख्या हिरवळीच्या पिकांचा तसेच पाचटाचा वापर, जीवामृत, शेणखत यांचा वापर सुरू केला. तसेच ऊस कधीही उपलब्ध होईल, याची सोय त्यांनी लावली. त्यांनी को ८६०३२ हे वाण घेतले आहे. काही वेळा खोडवाही ठेवला.

त्यांनी सेंद्रिय शेतीत सातत्य ठेवले आहे. तसेच कृषी विकास योजनेअंतर्गत वाघेश्‍वरकृपा सेंद्रिय गटात त्यांचा सहभाग आहे. त्यांनी स्वच्छ व आधुनिक पद्धतीने गूळ करायचे ठरवले. असे असताना सुरुवातीला उसाचे एकरी उत्पादन सेंद्रिय पध्दतीमुळे अत्यंत घटले. त्यांना गुऱ्हाळ उभारणीसाठी जवळपास २० लाख रुपयांपर्यंत खर्च आला. आता कोणतीही रसायने न वापरता उत्कृष्ट पद्धतीने प्रति बॅच सुमारे १७५ ते १८५ किलोपर्यंत गूळनिर्मिती होते. दिवसाला एकूण ५०० ते सव्वापाचशे किलो गूळ तयार होतो.

त्यांची वर्षभरात ४५ टनांपर्यंत विक्री होते. यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. सेंद्रिय पद्धतीत उसाचे एकरी उत्पादनही रासायनिकच्या तुलनेत कमी असते. यामुळे गुळाची किंमतही आम्हाला परवडण्याजोगीच ठेवावी लागते. कोरोना काळात त्यांना आर्थिक फटका देखील बसला, मात्र आता दिवस बदलत आहेत. तसेच येथे काकवीचे उत्पादनही घेण्यात येते. त्याचा दर १०० रुपये प्रति लिटर असा आहे, असे सागर यांनी सांगितले. त्यांना गोविंद फराटे तसेच कांतिलाल नलगे यांचे मार्गदर्शन लाभले. सागर यांचे आजोबा किसनभाऊ व चुलते मदनदादा यांना गुऱ्हाळाचा आधीच अनुभव होता. त्याची मदत झाली.

English Summary: Rajvijay brand of organic jaggery made from organic sugarcane
Published on: 05 February 2022, 11:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)