Success Stories

शेती क्षेत्रात काळानुरूप मोठे बदल होताना दिसत आहेत, आता पारंपरिक पिकांऐवजी नगदी तसेच फळबागांची लागवड करणे गरजेचे बनले आहे. फळबाग लागवड करून अनेक शेतकरी मोठी कमाई करत आहेत, असेच एक शेतकरी आहेत राजेश पाटीदार. राजेश पाटीदार देखील पूर्वी इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक पिकांची शेती करत होते.

Updated on 25 December, 2021 12:47 PM IST

शेती क्षेत्रात काळानुरूप मोठे बदल होताना दिसत आहेत, आता पारंपरिक पिकांऐवजी नगदी तसेच फळबागांची लागवड करणे गरजेचे बनले आहे. फळबाग लागवड करून अनेक शेतकरी मोठी कमाई करत आहेत, असेच एक शेतकरी आहेत राजेश पाटीदार. राजेश पाटीदार देखील पूर्वी इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक पिकांची शेती करत होते.

ते प्रामुख्याने आपल्या शेतात बटाटा कांदा लसुन इत्यादी पिके घेत असत. मात्र पारंपरिक पिकातून राज्यांना हवे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते, शिवाय पारंपरिक पिकांना खर्च देखील मुबलक प्रमाणात होत होता. त्यामुळे या सर्वांना कंटाळून राजेश यांनी चार वर्षांपूर्वी थाई पेरूची बाग लावली. राजेश यांनी तीन एकर क्षेत्रात पेरूची बाग लावली, आणि पेरू लागवडीतून राजेश आता वर्षाकाठी पाच लाख रुपयांची कमाई करत आहेत. राजेश पाटीदार हे मूळचे मध्यप्रदेश राज्याचे, त्यांचे गाव इंदूर जिल्ह्यातील जामली हे आहे. जामलीमध्येच राजेश शेती करतात.

हेही वाचा:-काय सांगता! आता घरबसल्या काही मिनिटातच करता येणार माती परीक्षण; जाणुन घ्या याविषयी सविस्तर

राजेश पेरूच्या बागेत पांढरी मुसळी आले हळद यांसारखे औषधी पिकांची देखील आंतरपीक म्हणून लागवड करतात. यातून त्यांना एक्स्ट्रा इन्कम मिळून जाते. राजेश यांनी पेरू बाग लागवड करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला, त्यांनी थाई पेरूची लागवड केली, त्यांनी पेरूची रोपे की छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून खरेदी केले. त्यांनी जवळपास अठराशे झाडांची लागवड केली. पेरू लागवड करताना शेतकरी हेक्टरी पंधराशे रोपांची लागवड करतात. राजेश यांच्या मते, त्यांनी बागेसाठी ठिबक सिंचन केले होते यामुळे पाण्याची बचत झाली. साधारणपणे दीड वर्षात थाई पेरूला फळे येण्यास सुरुवात होते.

हेही वाचा:-Successful Farmer: 'या' शेतकऱ्याच्या डोक्यावर होते 15 लाख रुपय कर्ज, आज कमवतोय लाखो

राजेश यांना मागच्या वर्षी 1800 पेरूच्या झाडातून तब्बल 20 टन उत्पादन प्राप्त झाले होते, आणि त्यांना यातून दहा लाख रुपयांची कमाई झाली होती, त्यांना पाच लाख रुपये निव्वळ नफा यातून राहिला होता. यंदादेखील त्यांना तीस टन उत्पादनाची आशा आहे, व यातून त्यांना सात ते आठ लाख रुपये निव्वळ नफा निघण्याची आशा आहे.

हेही वाचा:-ग्रेट! या शेतकऱ्याने विकसित केलेल्या कांद्याच्या वाणाने शेतकरी होत आहेत मालामाल! जाणून घ्या कांद्याच्या या जातीविषयी

English Summary: rajesh patidar named farmer earn annualy 5 lakh from 3 acre land by gauva farming
Published on: 25 December 2021, 12:47 IST