पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर अंजीर आणि सीताफळाची शेती केली जाते. याठिकाणी गेले तर रोडवर अनेक ठिकाणी अंजीर विकताना शेतकरी आणि व्यापारी दिसतात. असे असताना आता स्थानिक बाजारपेठेसह परदेशात देखील हा माल पोहोचत आहे. पुरंदरमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी विविध उद्योगांच्या आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जगावर राज्य सुरुवात केली आहे. यामुळे हा माल सातासमुद्रापार गेला आहे.
पुरंदरमध्ये सीताफळ रबडी, अंजीर रबडी, जांभूळ पल्प, पेरू पल्प, स्ट्रॉबेरी गर, आंबा गर, चिकू गर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालावर फळप्रक्रिया करून तो माल कोल्डस्टोरेजमध्ये ठेवून ऑर्डर प्रमाणे जागतिक बाजारपेठेत विक्री केली जात आहे. याला चांगली मागणी देखील आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. तरुणांनी पुढे येत याबाबत अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. दिवे आणि सोनोरी गावच्या तरुणांनी एकत्र येत मागील दोन वर्षांपूर्वी ऑरगॅनोबाईट फार्मर प्रोड्यूसर कंपनी या नावे कंपनी स्थापन केली आहे.
या तरुणांनी येथील शेतकऱ्यांचा कृषीमाल खरेदी करून त्याचा पल्प किंवा स्लाईस बनवून ते जागतिक बाजारपेठेत विक्री करतात. याला पुरंदरचा शेतमाल असल्याने अधिकचे दरही मिळत आहेत. कृषी पदवीधर (इील.सुशील पोपट झेंडे आणि बी.कॉम. पदवी घेतलेले अक्षय गोकुळ कामथे आणि इतर पाच संचालक यांच्या संकल्पनेतून ही कंपनी स्थापन करण्यात आली. आज त्यांनी मोठी उलाढाल होत आहे.
काय सांगता! खरिपाच्या तोंडावर खतांच्या पोत्याला फुलांचा हार, वाचा नेमकं काय आहे कारण..
त्यांच्या कंपनीमध्ये 35 कामगार रोज काम करतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. आकर्षक पॅकिंग आणि उत्कृष्ट क्वालिटीमुळे स्थानिक बाजारपेठे सोबतच जगभरातील बाजारपेठेत त्यांच्या मालाला मागणी आहे. या कंपनीची आर्थिक उलाढाल जवळपास वार्षिक दीड कोटी रुपये आहे. येथील अंजिराला जी आय मानांकन मिळाल्यामुळे येथील अंजिराला आणि त्याच्या बनवलेल्या पदार्थांना मागणी बाजारपेठेत आहे.
महत्वाच्या बातम्या;
चांदुरच्या तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण, कांदा प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक
Post Office Scheme; बातमी कामाची! पोस्ट ऑफिसची नवीन योजना, १० हजार भरा आणि १६ लाख मिळवा
माळेगाव साखर कारखाना राज्यात सर्वात हायटेक, तोडणीपासून ते गाळपापर्यंत सगळंच स्मार्ट...
Published on: 08 June 2022, 11:26 IST