पोषक वातावरण असले की शेतकरी आपल्या शेतात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतो मात्र प्रतिकूल परिस्थितीत जर प्रयोग करायचे म्हणले तर थोडं जडच जात. तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावामध्ये या शेतकऱ्याच्या उपक्रमाने सर्वांना चकित केले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण भीती तसेच लॉकडाउन चा विचार करत आहे परंतु मसला खुर्द गावातील अॅड सोमेश वैद्य यांच संपूर्ण कुटुंब पेरूची बाग जोपासण्यात दंग आहे. वैद्य कुटुंबाने १८ महिने चांगल्या प्रकारे पेरूच्या बागेची जोपासना केली आहे याचेच फळ म्हणून त्यांना २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वैद्य कुटुंबाने आपल्या शेतात पीक वाणाच्या जातीचा पेरू लावला होता त्यामधून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे.
परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड :-
२०२० च्या मधील जून महिन्यात तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात तसेच उत्तर सोलापूर मधील मार्डी गावामध्ये ५ एकर मध्ये पिंक सुपर वाण जातीच्या पेरू ची लागवड केली होती. वैद्य कुटुंबाने कष्ट तर केलेच होते मात्र त्याबरोबर योग्य प्रकारे नियोजन सुद्धा केले होते.ड्रीप सिंचन, खते तसेच झाडास पाणी उपलब्ध करून सर्व योग्य प्रकारे केले. जवळपास १० हजार पेरूच्या झाडांचे त्यांनी योग्य नियोजनात संगोपन केले आहे. सोमेश वैद्य यांनी शेतीला पाणी कमी पडू नये म्हणून १ एकरात शेततळे बांधले आहे तसेच मुबलक प्रमाणात पाण्याच्या २ विहिरी सुद्धा आहेत.
लॉकडाऊनच्या काळात मजूरांच्या हाताला काम :-
मागील वर्षी कोरोनाचे वातावरण असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम न्हवते तर शहरात राहणारे जे नागरिक होते त्यांनी काम सोडून गावाला जे काम भेटेल ते करण्यास सुरुवात केली.सोमेश वैद्य यांनी गरजू पुरुष व स्त्रियांना आपल्या शेतात रोजगार उपलब्ध करून दिला. यामुळे पेरुचे संगोपन तर झालेच त्यासोबत मजुरांना चार पैसे ही भेटू लागले. सोमेश यांच्या प्रयोगात तसेच यशात त्यांच्या कुटुंबाचा तर हात आहेच त्याबरोबर मजुरांनी सुद्धा त्यांना साथ दिली आहे.
तीन महिन्यांमध्ये 100 टन पेरुचे उत्पादन :-
पेरूची लागवड करून १८ महिन्यांचा कालावधी उलटला आहे जे की आता उत्पन्न सुरू झाले आहे. मागील तीन महिन्यांमध्ये सुमारे १०० टन पेरू मार्केट गेले त्यामधून त्यांना २५ लाख रुपये मिळाले.पिंक पेरूची चव वेगळी असल्याने बाजारामध्ये त्याला जास्त मागणी आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत सोमेश यांना २५ लाख रुपयांचा फायदा झालेला आहे.
Published on: 11 January 2022, 08:50 IST