कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन पडल्यामुळे अनेक भागातील लोकांनी नोकरी सोडून आपला शेतीचा रस्ता पकडला, कोरोनामुळे भारताची अर्थव्यवस्था बिघडली होती पण फक्त कृषी क्षेत्राने ही व्यवस्था जाग्यावर आणलेली आहे.जळगाव जिल्ह्यामधील मुक्ताईनगर तालुका येथील ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने दुष्काळावर मात करत डाळिंबाची झाडे आपल्या शेतामध्ये लावली आणि त्यामधून त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले.नवनीत दत्तात्रय पाटील व दिलीप दत्तात्रय पाटील असे या दोघा भावांचे नाव आहे जे की मुक्ताईनगर मधील ग्रामीण भागात शेती करत आहेत. दोघा भावांनी अगदी चांगल्या प्रकारे नियोजन करून त्यांच्या सात एकर शेतीमध्ये डाळिंबाचे पीक घेऊन मोठे उत्पन्न घेतलेले आहे.
50 लाखांचं विक्रमी उत्पादन:
नवनीत पाटील व दिलीप पाटील हे दोघे भाऊ जळगाव मधील मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा या ग्रामीण गावामध्ये राहतात, या दोन भावांनी दुष्काळावर मात करत डाळिंब या फळाची लागवड केली.नवनीत व दिलीप या दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना चांगली साथ तसेच प्रोत्साहन दिल्याने त्या दोघांना यामध्ये चांगले यश मिळाले आहे.जे की पाटील बंधूनी त्यांच्या सात एकर शेतीमधून ९०० क्विंटल डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे, पाटील बंधू ना त्यांच्या सात एकर शेतीमधून कमीत कमीत ५० लाख रुपयांचा विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
हेही वाचा:कोरोनाच्या काळात इंजिनिअर, एमबीए बेरोजगारांनी धरली कुक्कुटपालनाची वाट
पाटील बंधूंचा इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श :
नवनीत पाटील व दिलीप पाटील या दोन्ही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे तसेच अगदी व्यवस्तीत नियोजन केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आणि हा एक आदर्श त्यांच्या गावातील शेतकऱ्यांपुढे तसेच आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनपुढे तयार झालेला आहे.पाटील बंधूंच्या शेतातील डाळिंब अत्ता बांगलादेश मध्ये गेलेलं आहे. एवढे शक्य होणे ते फक्त त्यांच्या कुटुंबीयांनी साथ दिल्यामुळे.
मुक्ताईनगरची डाळिंब थेट बांग्लादेशला:
नवनीत पाटील व दिलीप पाटील यांच्या शेतातील डाळिंबे अत्ता थेट बांगलादेश मध्ये जाणार आहे जे की पंढरपूर मधील एका व्यापाऱ्याच्या माध्यमातून ही डाळिंबे बांग्लादेश ला जाणार आहेत अशी माहिती नवनीत पाटील व दिलीप पाटील यांनी दिली आहे. तसेच त्यांनी सांगितले की आपले जर व्यवस्थित प्रकारे नियोजन असेल तर आपण आपल्या शेतीमधून कोणत्याही प्रकारचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. हलाकीच्या परिस्थितीवर मात करत आम्ही योग्य प्रकारे नियोजन करून डाळिंबाच्या शेतीमधून चांगले उत्पन्न घेतले तसेच पाटील बंधू चा शंभर एकर पर्यंत शेतीचा विस्तार पोहचलेला आहे.
Published on: 28 July 2021, 06:21 IST