Success Stories

आजच्या काळात शेतकऱ्यासाठी शेती हे उत्तम उत्पन्नाचे साधन बनले आहे. देशातील विविध शास्त्रज्ञांनी शेतीला प्रगत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर यशस्वी प्रयोगही केले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत आहे. मात्र असे असले तरी, बदलत्या काळात रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर वाढल्याने जमिनीचा पोत आता ढासळू लागला आहे.

Updated on 06 May, 2022 3:36 PM IST

आजच्या काळात शेतकऱ्यासाठी शेती हे उत्तम उत्पन्नाचे साधन बनले आहे. देशातील विविध शास्त्रज्ञांनी शेतीला प्रगत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर यशस्वी प्रयोगही केले आहेत.  याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत आहे. मात्र असे असले तरी, बदलत्या काळात रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर वाढल्याने जमिनीचा पोत आता ढासळू लागला आहे.

यामुळे सेंद्रिय शेतीची नितांत आवश्यकता आता भासत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आज आपण सेंद्रिय शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणुन घेणार आहोत. ज्यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देताना जवळपास शेतीमध्ये शेकडो यशस्वी प्रयोग केले आहेत. मित्रांनो आम्ही ज्या शेतकऱ्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे भारतभूषण त्यागी. सेंद्रिय शेतीत भारत भूषण यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशामुळे त्यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा

Farmers Income : भारतीय शेतकरी शेतीतुन किती कमवतो? नाही माहिती; मग वाचा याविषयी सविस्तर

खांदेशात अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमला जातो नवीन सालगडी; मात्र कठीण परीक्षा करावी लागते पास; वाचा याविषयी

भारत भूषण मूळचे बुलंदशहर येथे राहणारे. भारत भूषण खूपच साधे जीवन जगतात. विशेष म्हणजे भारत भूषण यांनी दिल्ली विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी संपादन केली आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर भारत भूषण यांना इतर मुलांप्रमाणे नोकरी करायची होती, पण आपल्या मुलाने घरातील शेतीचे काम सांभाळावे, असे त्यांच्या वडिलांचे मत होते, कारण त्यांच्या वडिलांचा विश्वास होता की आगामी काळात शेतीचा व्यवसाय हा या जगातील सर्वात यशस्वी व्यवसाय राहणार आहे.

त्यामुळे वडिलांच्या शब्दाबाहेर न जाणारा भारत यांनी वडिलांच्या शब्दाला मान दिला आणि 1976 साली भारतभूषण त्यागी यांनी शेतीकडे आपला मोर्चा वळवला. यानंतर आधुनिक शेती करताना भारत भूषण यांच्या लक्षात आले की या शेतीचे काम खर्चावर आधारित आहे, ज्यामध्ये मशागत, बियाणे, खते, सिंचन, कीटकनाशके यांच्या बळावर शेती केली जाते. सर्वसामान्य शेतकर्‍यासाठी ही खूप महागडी शेती आहे, कारण शेतकर्‍याला नांगरणी, खते, बी-बियाणे, औषधे यासाठी बाजारावर अवलंबून राहावे लागते.

भारत भूषण सांगतात की, आधुनिक शेतीसाठीही अनेक पर्याय शोधण्यात आले आहेत, जे पुढीलप्रमाणे आहेत - सेंद्रिय शेती, केंद्रीय शेती, शून्य बजेट शेती इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. या प्रकारच्या शेतीतून शेतकऱ्यांना आणखी बरेच फायदे मिळतात, परंतु हे तंत्रज्ञान शाश्वत उपाय ठरत नाही. त्यामुळेच शाश्वत उपाय आणि आर्थिक सुबत्ता डोळ्यासमोर ठेवून निसर्गाच्या व्यवस्थेला धरून शेतीचा काही तरी मार्ग काढण्याच्या या शोधात भारतभूषण त्यागी पुढे सरसावले.

सेंद्रिय शेतीकडे वाढता कल

यामध्ये पुढे जात त्यांनी सेंद्रिय शेतीकडे आपला कल वाढवला तसेच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रेरित केले. भारतभूषण त्यागी म्हणाले की, चांगल्या कमाईसाठी शेती हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जास्त शेतीची आवश्यकता नसते. कमी क्षेत्रात देखील शेतकरी बांधव आपल्या मेहनतीतून चांगला नफा सहज कमवू शकतो. सेंद्रिय शेतीसाठी अधिक जमिनीची विशेष गरज भासत नाही.

English Summary: Organic Farming: The Best Formula for Organic Farming by Padma Shri Bharat Bhushan; Income will double
Published on: 03 May 2022, 01:57 IST