सध्या शेतकऱ्यांचा कल हा पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहे. पारंपारिक शेतीमध्ये खर्चाच्या मानाने हवे तेवढे उत्पादन मिळत नसल्यानेशेतकरी आता पारंपारिक पिकांकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
त्याबदल्यात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करून कमी खर्चामध्ये चांगला नफा मिळवता येतो हे शेतकऱ्यांना समजल्याने शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे.जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचा विदेशी भाजीपाला, ड्रॅगन फ्रुट,स्ट्रॉबेरी,विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सफरचंदाचा प्रयोग देखील शेतकर्याने यशस्वी केला आहे.यामध्येच बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा औषधी गुणधर्मअसलेल्या वनस्पतींच्या लागवडीकडे वाढत आहे.कारण यामध्ये थोडीशी रिस्क असली तरी कमी उत्पादन खर्चामध्ये चांगले उत्पन्न व योग्य भाव मिळण्याची हमी असते.या लेखामध्ये आपण अशाच एकाप्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहात.
या शेतकऱ्याने चिया बियाणे च्या लागवडीतून घेतले बंपर उत्पन्न…..
नामदेव माकोडे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोन येथे राहणारे आहे.माकोडे यांनी औषधी आणि आयुर्वेदिक गुणांनी युक्त असणारे चिया बियाण्याचे उत्पादन घेण्याचे धाडस केले आहे. या तरुण शेतकऱ्याचा प्रयोगामुळे कळंब सारख्या परिसरांमध्ये चिया बियाणे चे पीक मोठ्या प्रमाणात बहरत आहे. जर चिया बियाण्याचा विचार केला तर इतर खाद्य बियाणे प्रमाणेच ते आहे.चिया बियाणे मध्ये असलेल्या पोषक आणि औषधी गुणधर्मांमुळे खाण्यामध्ये त्याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. आरोग्याच्या विषयी बऱ्याच समस्या दूर करण्यासाठी चिया बियाणे महत्त्वपूर्ण आहे.महाराष्ट्र मध्ये बराच बाजारपेठांमध्ये या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. माकोडे यांनी चिया बियाणे लागवडीचा सविस्तर अभ्यास केला व त्यानंतर लागवडीचा निर्णय घेतला.हे बियाणे त्यांनी हरियाणा येथून ऑनलाइन पद्धतीने मागवले.जिया बियाण्याची लागवड केल्यापासून तीन महिने पंधरा दिवसांमध्य उत्पादन मिळते.माकोडे यांनी चीया बियाण्याची लागवड नोव्हेंबर महिन्यात केली होती.
आता हे पीक काढणीला असून शेवटच्या टप्प्यात आहे. माकोडे यांनी ची या बियाण्याची लागवड ही साडेतीन एकर वर केली असून त्यासाठी निव्वळ बारा हजार रुपये खर्च आलेला आहे.या माध्यमातून त्यांना दोन लाखाचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे.चिया बियाण्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात जसे की यामध्ये पोट्याशियम,फायबर,कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जस्त,तांबे, सोडियम फॉस्फरस तसेच मॅगेनीज सारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या बियाण्याला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे.
Published on: 24 February 2022, 02:12 IST