मित्रांनो भारतात अनेक राज्यांत उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य प्रमुख आहेत. यावर्षी झालेल्या गाळप हंगामात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला धोबीपछाड देत प्रथम स्थान पटकावले आहे. यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. मात्र आज आम्ही आपणास उत्तर प्रदेशमधील एका अवलिया ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या भन्नाट कामगिरीविषयी सांगणार आहोत.
मित्रांनो खरं पाहता पश्चिम उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्याला पितळ नगरी म्हणुन ओळख मिळाली आहे. याशिवाय ऊस लागवडीसाठी देखील मुरादाबाद जिल्हा विशेष ओळखला जातो. हा जिल्हा राज्यभरात ऊसाचे आगार म्हणून ओळखला जातो, येथे बहुतांश शेतकरी ऊसाची लागवड करतात.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण हे केवळ आणि केवळ ऊस पिकावरचं अवलंबून आहे. याच मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी तहसील परिसरात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने टॅंच पद्धतीने 23 फुटांपेक्षा जास्त उंचीचा ऊस पिकवला आहे जो की संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
असं म्हणण्यापेक्षा या उसाची संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे. हा ऊस मोहम्मद मुबीन या ऊस उत्पादक शेतकऱ्यांने उत्पादित केला आहे. हा ऊस पाहण्यासाठी मुरादाबाद विभागातील शेतकरी मोहम्मद मुबीन यांच्या शेतात पोहोचत आहेत. याशिवाय येथे हजर होणारे शेतकरी या शेतकऱ्याकडून ऊस कसा पिकवायचा हे समजून घेत आहेत. विशेष म्हणजे मोहम्मद मुबीन इतर शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन देखील करीत आहेत. शिवाय या टेक्निकची माहिती ते शेतकऱ्यांना सातत्याने देत आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा मिळू शकेल.
उसाचे उत्पन्न दुप्पट वाढले - खरं पाहता, बिलारी भागातील थनवला येथे राहणारे मोहम्मद मोबीन यांनी शेतीत काहीतरी वेगळे करावे म्हणून ऊस शेती सुरू केली. या शेतकऱ्याने जरा हटके करायचे असे मनोमणी ठरवल्याने व काहीतरी नवीन करण्याची आवड असल्याने टंच पद्धतीने या शेतकऱ्याने उसाचे पीक घेण्यास सुरुवात केली. या पद्धतीने लागवड केलेला ऊस त्यांच्या शेतात उभा आहे आणि उसाची उंची 23 फुटांपेक्षा जास्त आहे.
निश्चितच मोहम्मद यांनी केलेला शेती मधला हा बदल यशस्वी ठरला आहे. मोहम्मद यांनी उत्पादित केलेल्या ऊसाचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्यांचे वजनही तुलनेने सामान्य उसाच्या दुप्पट आहे. जिथे साधारणपणे एका बिघा शेतात फक्त 40-50 क्विंटल ऊस उपलब्ध असतो, तिथे मोहम्मद मोबीनच्या टंच पद्धतीमुळे एक बिघा शेतात 100 क्विंटलपेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन त्यांना मिळू लागले आहे.
मोबीनने या टेक्निकबाबत अधिक माहिती दिली शिवाय शेतकऱ्यांना सांगितले की, ऊसाचे चांगले पीक घेण्यासाठी त्यांनी अवलंबलेल्या पद्धतींनी पिके घेण्यास सुरुवात करावी. त्यांच्यामते, या पद्धतीने ऊस उत्पादित केला तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Published on: 01 May 2022, 11:02 IST