यांत्रिकीकरण आणि शेतीया दोन गोष्टी एकमेकाशी निगडित बनत चाललेले आहेत.शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि यंत्रांचाविकास होत असल्यानेशेतीची कामे मग ती पिकांची पेरणी असो किंवा काढणीयंत्रांच्या सहाय्याने होतआहे. शेतामध्ये यंत्रांचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा वेळ तर वाचतोच परंतु कमी वेळात जास्तीचे काम होऊन कष्ट ही कमी होतातपरिणामी उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारचे वाढहोते.या लेखात आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी पाहणार आहोत की जे शेतातील पेरणी ते काढणीपर्यंत ची सगळी काम यंत्राच्या साह्याने करतात.त्यांच्याबद्दल या लेखात जाणून घेऊ.
बोडखा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे राहणारे नामदेव वैद्य हे त्यांच्या शेतातील सगळ्या प्रकारची कामे यंत्राच्या साह्याने करतात त्यामुळे त्यांचे श्रम,वेळ आणि पैसा यात चांगल्या प्रकारची बचत होते.विशेष म्हणजे वैद्य यांनी काही यंत्रे स्व कौशल्यातून विकसित केली आहेत.त्यांनी आपल्या शेतीचा विकास हा दोन एकर पासूनते 49 एकरापर्यंत केला आहे.तसेच ते त्यांच्या मित्राचीतीस एकर शेती 35 वर्षापासून कसत आहेत. वैद्य यांनी त्यांच्या गावातील काही शेतकऱ्यांच्या सहकार्याने कास्तकार सोया प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे..त्या शेतीमध्ये कापूस,सोयाबीन, तुर, हरभरा इत्यादी सारखे पिके घेतात. त्यांनी शेतात कामांसाठी या यंत्राची गरज आहे त्यानुसार यंत्र खरेदी केलेत.तसेच काही यंत्र त्यांनी स्वतः विकसित केले आहेत व त्यात सुधारणाही केलेआहेत.
खत देण्यासाठी वापर करतात ट्रॅक्टरचलित खतयंत्राचा
त्यांच्याकडे असलेल्या या खर्च यंत्रातून शेणखत किंवा दाणेदार स्वरूपातील रासायनिक खत देखील देता येते. या यंत्राचा वापर सोयाबीन, कापूस,हरभरा, तीळ आदी पिकात त्याचा वापर पेरणीपूर्व काही दिवस आधी करता येतो. या यंत्राच्या साह्याने एका दिवसात सुमारे वीस ते पंचवीस एकर पर्यंत काम होते.
कापूस पेरणी यंत्र
कापूस पेरणी यंत्राची रचना नामदेव वैद्य यांनी स्वतः केली आहे. त्यासाठी त्यांनी राजस्थानमधून कापसाचे बियाणे ठेवण्यासाठी दोन बॉक्स आणले. या यंत्रामध्ये त्यांनी जुन्या काकऱ्यांचा वापर केला.चाके मार्केटमधून विकत घेतली. बैलचलित असलेल्या या यंत्राद्वारे एका दिवसात सहा एकर चे काम पूर्ण होते.या यंत्राची किंमत साडे पाच हजार रुपये आहे.
कटर मशीन
कपाशी पिकाची काढणी झाल्यानंतर उरलेल्या कपाशीच्या अवशेषांचे तुकडे करूनहे तुकडे शेतातच पसरवण्याचे काम हे यंत्र करते.हे यंत्र त्यांनीएक लाख 80 हजार रुपयांपर्यंत खरेदी केले आहे. या यंत्राच्या साहाय्याने दिवसाला तीन ते चार एकरा पर्यंत काम होते.
पेरणी यंत्र
या यंत्राद्वारे सोयाबीन, मका,हरभरा,उन्हाळी मूगइत्यादी पिकांची पेरणी करता येते.पेरणी झाल्यानंतर सरी झाकण्यासाठी देखील या यंत्राचा उपयोग होतो.
कपाशीला खत देण्यासाठी यंत्र
नामदेव वैद्य यांनी आपल्या गरजेनुसार हे यंत्र स्थानीककार्यशाळेत तयार केले आहे.या यंत्राचा वापर कपाशीला खत देण्याव्यतिरिक्त ऊसाला देखील होतो. दिवसभरातदोन व्यक्ती सहा एकर चे काम या यंत्राच्या साह्याने करतात
नामदेवराव वैद्य यांचा कृषिरत्न पुरस्काराने गौरव
त्यांच्याकडे शेती क्षेत्र जास्त असल्याने मजुरांची समस्या फार मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्यांनी 2014मध्ये ट्रॅक्टर खरेदी केले व पेरणी यंत्र घेतले. 2016 मध्ये अजून एक ट्रॅक्टर खरेदी केला. त्यांनी ट्रॅक्टर वरील बाजूचा टप काढून दोन्ही बाजूंनापंचवीस लिटर क्षमतेचा पंप बांधून तुरीवर फवारणी करण्याचा प्रयोग केला.त्यांच्या या सगळ्या कार्याची व कौशल्याची दखल घेत राजीव गांधी फाउंडेशन च्या वतीने कृषी रत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.
Published on: 27 September 2021, 03:33 IST