जीवनामध्ये व्यक्तिगत रित्या व सामाजिक अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या येत असतात. बर्याचदा अशा समस्या सोडवणे महाकठीण होऊन जाते बऱ्याचदा अशा समस्यांचा अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम हा स्वतःवर आणि आसपासच्या समाज जणांवर पाहायला मिळतो.
परंतु समस्या कितीही मोठी असली तिच्यावर उत्तर हे असतेच. परंतु यासाठी गरज असते ती प्रामाणिकपणे असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्याची व त्यासाठी अफाट जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी यांची. या गोष्टी केल्या ना अगदी अशक्यप्राय वाटणाऱ्या समस्या केव्हा दूर होतात हे कळत देखील नाही व अशा समस्या दूर झाल्यानंतर जे नवीन आणि आनंदाचे किरणे उगवतात त्यांची अनुभूती शब्दातीत आहे. या लेखामध्ये आपण अशाच एका मिशन विषयी माहिती घेणार आहोत कि ज्या मिशनने दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटावर मात करुन एक प्रकारची जल क्रांतीच घडवून आणली.
नक्की वाचा:फुल शेती करायचा विचार करत आहात?तर शेवंती लागवड ठरेल फायदेशीर फुलशेती
काय आहे मिशन 500 कोटी
आपल्याला माहित आहेच की 2016साली राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त परिस्थिती होती. या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी नापिकीमुळे आत्महत्या केल्या. सोन्यासारखे पशुधन अक्षरशः डोळ्यासमोर तडफडून मरताना पाहायची वेळ आली होती. इतकी भयावह परिस्थिती 2016 या वर्षी झाली होती.
ही भयंकर आणि भीतीदायक परिस्थिती पाहून चाळीसगाव चे भूमिपुत्र तथा सहाय्यक आयुक्त उज्वलकुमार चव्हाण हे खूपच हळहळले. बस तेथूनच सुरू झाला प्रवास तो 500 कोटी जलसाठा या अभियानाचा. यामध्ये ग्रामस्थ व सामाजिक संस्थांच्या मदतीने 500 कोटी जलसाठा हे मिशन राबविण्यास प्रारंभ केला. सर्वप्रथम हा प्रयोग चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथे 2017 साली राबवण्यात आला. त्या ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो संपूर्ण राज्यात गेल्या चार वर्षात 70 गावांमध्ये सुरू आहे. या सत्तर गावांमधील 34 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला असून शेतीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. हे अभियान पाहून जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंह प्रभावित झाले व ते 19 ते 21 फेब्रुवारी या दरम्यान तीन दिवस चाळीस गावात मुक्कामी आले. त्यांनी सगळ्या गाव शिवारात फेरी मारली व पाहिले. हे अभियान जर गावागावात राबवले तर गावांचे चित्र बदलेल असे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले.
या मिशनचे स्वरूप
मिशन 500 कोटी अभियानाच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये पावसाचे जे पाणी वाहून जाते त्यापैकी फक्त पाच कोटी लिटर जलसाठा गावाच्या एका शिवारात केल्यास पाण्याचा प्रश्न मिटतो हे लक्षात आल्याने उज्वल कुमार चव्हाण यांनी पाचशे कोटी लिटर जलसाठा करण्याचे मिशन हाती घेतले.
जे गावात दुष्काळग्रस्त आहेत अशा गावांसाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने कामासाठी पोकलेन उपलब्ध करून द्यायचे व त्याचा डिझेलचा खर्च गावातील शेतकऱ्यांनी करायचा. तसेच त्यांना मोबदला म्हणून त्या शेतकऱ्यांची बांधबंदिस्ती शेत रस्ता तयार करून द्यायचा जेणेकरून त्यांची ही विहिरींची भूजल पातळी वाढते. यामध्ये उज्वल कुमार यांनी पंधरा जणांची निवड केली. या निवडलेल्या 15 जणांना नऊ महिन्याचे ट्रेनिंग दिले व पाच जणांना एका गावचे जबाबदारी दिली. हे पाच जण स्वयंस्फूर्तीने काम करतात व कोणताही मोबदला घेत नाहीत. जलसंधारणासाठी आवश्यक असलेली सगळी कामे ते माथा ते पायथा पर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी करतात व वर्षभरात चेहरा-मोहरा बदलतात. मिशन मध्ये अगोदर चाळीसगाव तालुक्याची निवड करण्यात आली व तेथे हे राबवण्यात आले. या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील दीडशे गावांपैकी 100 गावांमध्ये जवळजवळ दुष्काळी परिस्थिती असते.
हे अभियान तेथे राबवल्याने चार वर्षांमध्ये 28 गावांचे चित्र पालटले. त्यामुळे राज्यभरातील अनेक गावांमध्ये हे अभियान राबवण्याची मागणी झाल्याने सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद व जळगाव या चार जिल्ह्यात 70 गावांमध्ये हे काम सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 34 गावे टंचाई मुक्त झाली असून 36 गावांमध्ये काम सुरू आहे.( संदर्भ- दिव्य मराठी )
Published on: 23 March 2022, 03:43 IST