Success Stories

देशात सर्वात जास्त अल्पभूधारक शेतकरी शेती करत असतात, अल्पभूधारक शेतकरी कमी क्षेत्रात देखील लाखो रुपयांचे उत्पन्न अर्जित करू शकतात असे जर आम्ही आपणास सांगितले तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही? मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी दांपत्याने या अनहोनीला देखील होनी करून दाखवले आहे. बीड जिल्ह्यातील केसापूर शिवारातील रहिवासी शेतकरी कोरडे दाम्पत्यांनी अवघ्या 20 गुंठे क्षेत्रात कोबीची लागवड करून लाखो रुपये उत्पन्न प्राप्त केले आहे.

Updated on 21 January, 2022 6:39 PM IST

देशात सर्वात जास्त अल्पभूधारक शेतकरी शेती करत असतात, अल्पभूधारक शेतकरी कमी क्षेत्रात देखील लाखो रुपयांचे उत्पन्न अर्जित करू शकतात असे जर आम्ही आपणास सांगितले तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही? मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी दांपत्याने या अनहोनीला देखील होनी करून दाखवले आहे. बीड जिल्ह्यातील केसापूर शिवारातील रहिवासी शेतकरी कोरडे दाम्पत्यांनी अवघ्या 20 गुंठे क्षेत्रात कोबीची लागवड करून लाखो रुपये उत्पन्न प्राप्त केले आहे.

कोरडे दाम्पत्यांनी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे वीस गुंठे क्षेत्रात कोबीची लागवड केली, कोबी पिकासाठी योग्य नियोजन करून, कठोर परिश्रम घेऊन कोरडे दाम्पत्यांनी जवळपास अडीच लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न कमविले आहे. आतापर्यंत अडीच लाख रुपयांची कोबी विकली गेली असून अजून पन्नास हजार रुपयांचा माल वावरात शिल्लक असल्याचे कोरडे दाम्पत्यांनी सांगितले. केसापुरी शिवारात वास्तव्यास असलेले दामोदर कोरडे यांच्याजवळ जवळपास दीड एकर बागायती शेतजमीन आहे. कोरडे यांच्या विहिरीला देवाच्या कृपेने मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे कोरडे आपल्या शेतजमिनीत पारंपरिक पिकांची लागवड करत असतात. पारंपारिक पिकाला जोड म्हणून कोरडे भाजीपाला पिकांची लागवड करत आले आहेत. मागच्या वर्षी देखील कोरडे बंधूंनी नोव्हेंबर महिन्यात भाजीपाला पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रात पत्ताकोबी या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करण्याचे ठरवले. कोरडे यांनी नर्सरी मधुन सुमारे 14 हजार पत्ता कोबीची रोपे आणून आपल्या शेतात पुनर्लागवड केली.

पत्ताकोबी पिकासाठी योग्य ते व्यवस्थापन करून, मशागत करून यातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले. विशेष म्हणजे पत्ताकोबी लागवडीपासून ते काढणीपर्यंत अगदी पूर्वमशागत देखील कोरडे दाम्पत्यांनी एकही मजूर न लावता स्वतः काबाडकष्ट करून पत्ताकोबी पिकाची जोपासना केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 20 गुंठे क्षेत्रात लावलेल्या पत्ताकोबी पिकासाठी त्यांना मात्र पंचवीस हजार रुपये उत्पादन खर्च आला. पत्ता कोबीला त्यांनी डीएपी व 10:26:26 या खतांच्या दोन्ही मात्रा दिल्या तसेच हिमामेक्टीन नामक औषध देखील त्यांनी पत्ताकोबी पिकासाठी फवारले. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पत्ता कोबी चे पीक अल्प कालावधीतच काढणीसाठी तयार होते. हे पीक मात्र दोन महिन्यातच उत्पादन देण्यास सज्ज होत असते.

आतापर्यंत कोरडे दाम्पत्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांची कोबी विकली आहे, तसेच अजूनही  शेतात 50 हजार रुपये किमतीची कोबी वावरात असल्याचा त्यांचा अंदाज आहे. पत्ताकोबीला सुमारे 35 ते 40 रुपये प्रति किलो दर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसाकाठी सुमारे दहा हजार रुपयांची कोबी कोरडे दांपत्य विक्री करत आहेत. अल्पभूधारक शेतकरी देखील लाखो रुपयांची कमाई करू शकतात हे कोरडे दाम्पत्यांनी दाखवून दिले आहे. त्यांना मिळालेले हे घवघवीत यश इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श असल्याचे सांगितले जात आहे.

English Summary: minority farmers can also earn millions
Published on: 21 January 2022, 06:39 IST