Success Stories

महाराष्ट्रातील खानदेशात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथील केळी उत्पादक शेतकरी निसर्गाशी दोन हात करत आहेत तसेच अनेकदा केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिकाला (Banana Crop) कवडीमोल दर मिळत असल्यामुळे लाखों रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात (Bhusaval) केळी उत्पादक शेतकरी (Banana growers) आता हंगामी पिकाकडे (Seasonal crop) वळू लागले आहेत.

Updated on 19 April, 2022 1:15 PM IST

परिसरातील शेतकरी बांधव आता अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या पिकांची लागवड करताना बघायला मिळत आहेत. तालुक्यातील मौजे कोळवद येथील हेमंत रामदास पाटिल या तरुण शेतकऱ्याने देखील पीकपद्धतीत बदल (Changes in cropping pattern) करत नगदी पिकांची (Cash Crop) लागवड करण्याचा निश्चय मनाशी बाळगला. हेमंत यांनी दोन एकर क्षेत्रात कलिंगड पिकाची लागवड (Cultivation of Watermelon crop) केली आणि अवघ्या 76 दिवसात यातून दर्जेदार 54 टन उत्पादन प्राप्त केले. म्हणजेच एकरी 27 टण असा उतारा त्यांना मिळाला. दोन एकरात टरबूज शेती साठी लागवड करण्यापासून ते काढणीपर्यंत त्यांना सुमारे 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे.

विशेष म्हणजे हेमंत यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कलिंगड पिकाची लागवड केली आणि अवघ्या 70 दिवसांत कलिंगड चे यशस्वी उत्पादन घेतले. यासाठी या नवयुवक शेतकऱ्याला कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचे मार्गदर्शन लाभले.

खाजगी कृषी केंद्राच्या अनमोल अशा मार्गदर्शनाने या नवयुवक शेतकऱ्याला कलिंगडचे चांगले उत्पादन मिळाले. या केंद्राने सांगितल्याप्रमाणे हेमंत यांनी कलिंगड पिकासाठी व्यवस्थित पाण्याचे व्यवस्थापन तसेच खताचे व्यवस्थापन केल्यामुळे योग्य वेळी कलिंगड पीक तयार झाले आणि चांगले दर्जेदार उत्पादन त्यांना मिळाले आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे या पवित्र महिन्यात कलिंगड पिकाला मोठी मागणी असते आणि म्हणूनच हेमंत यांना या कलिंगडच्या पिकातून चांगला नफा देखील मिळाला आहे. सध्या बाजारात कलिंगड 11 ते 12 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे.

म्हणजेच हेमंत यांना अवघ्या अडीच महिन्यात सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हेमंत यांच्या मते, इतर हंगामी पिकांच्या तुलनेत कलिंगड पिकाला निसर्गाचा लहरीपणा जास्त भासत नाही यामुळे यावर रोगाचे सावट कमी असते आणि म्हणुन चांगले उत्पादन मिळते. रोगराईचे सावट कमी असल्याने यासाठी उत्पादन खर्च देखील कमी असतो. यामुळे कलिंगडचे पिक शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकतो असा त्यांचा विश्वास आहे.

English Summary: Maximum of Jalgaon farmers !! Production of 54 tons of watermelon in just two acres; Earned 'so much' in two and a half months
Published on: 19 April 2022, 01:15 IST