Success Stories

राज्यातील शेतकरी बांधव अलीकडे मोठ्या प्रमाणात पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आहेत. पारंपारिक पिकासाठी दिवसेंदिवस उत्पादन खर्च अधिकचा होत असून यापासून प्राप्त होणारे उत्पन्न मात्र दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे पारंपारिक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी तोट्याची सिद्ध होत आहे. आता शेतकरी बांधवांना देखील या गोष्टीची जाणीव झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधव आता अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या नगदी पिकांची लागवड करून चांगला मोठा नफा कमवत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते सोलापूर जिल्ह्यातून.

Updated on 19 February, 2022 10:05 PM IST

राज्यातील शेतकरी बांधव अलीकडे मोठ्या प्रमाणात पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आहेत. पारंपारिक पिकासाठी दिवसेंदिवस उत्पादन खर्च अधिकचा होत असून यापासून प्राप्त होणारे उत्पन्न मात्र दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे पारंपारिक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी तोट्याची सिद्ध होत आहे. आता शेतकरी बांधवांना देखील या गोष्टीची जाणीव झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधव आता अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या नगदी पिकांची लागवड करून चांगला मोठा नफा कमवत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते सोलापूर जिल्ह्यातून.

जिल्ह्याच्या सोलापूर दक्षिण तालुक्यातील मौजे मंद्रूप येथील एका नवयुवक सुशिक्षित तरुणाने आधुनिकतेची कास धरून कलिंगड लागवड करीत अवघ्या साठ दिवसात लाखोंचे उत्पन्न पदरात पाडले आहे. मौजे मंद्रूप येथील रहिवाशी शेतकरी श्रीकांत मुंजे हे पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. श्रीकांत बीएससीचे शिक्षण करत आहेत. या नवयुवक सुशिक्षित शेतकऱ्यांने मात्र दीड एकर क्षेत्रात कलिंगडची लागवड करून तब्बल सहा लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. त्याचे हे दैदिप्यमान यश अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मंद्रूप चे रहिवाशी श्रीकांत यांच्याजवळ आठ एकर बागायती शेतजमीन आहे. श्रीकांत यांना लहानपणापासून शेती करण्याची मोठी आवड, त्यांची हीच आवड पदवीचे शिक्षण घेत असताना देखील शेती करण्यास त्यांना भाग पाडत होती. त्यांचे वडील शैलेश मुंजे यांनी देखील शेती क्षेत्रात वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत चांगला नफा कमवत असतात, श्रीकांत त्यांच्या वडिलांना शेती करण्यासाठी मदत करत असतात. सध्या श्रीकांत यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाने दीड एकर क्षेत्रात कलिंगड लागवड केली आहे तर दोन एकर क्षेत्रात द्राक्षाची बाग लावली आहे, तर उर्वरित साडेचार एकर क्षेत्रात त्यांनी इतर पिकांची लागवड केली आहे. खरीप हंगामात त्यांनी पपई चे देखील यशस्वी उत्पादन पदरात पाडले.

शैलेश मुंजे हे देखील उच्चशिक्षित असून सध्या ग्रामसेवक या पदावर कार्य करीत आहेत मात्र असे असले तरी त्यांना देखील शेतीची मोठी आवड आहे. त्यामुळे त्यांनी दीड एकर क्षेत्रात युनिको कंपनीचे व्यंकट एफ वन या जातीच्या कलिंगडची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी 8500 कलिंगडच्या रोपांची लागवड केली. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचे मार्गदर्शन घेत त्यांनी कलिंगडाचे पीक जोपासले, उत्तम मार्गदर्शनाने कलिंगड पिकास योग्य ती कीटकनाशकांची फवारणी केली. श्रीकांत यांनी आपल्या वडिलांचा शेती क्षेत्रातला अनुभव कामी आनत कलिंगडाचे पीक चांगले जोपासले. श्रीकांत यांनी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या योग्य मार्गदर्शनाने व आपल्या वडिलांच्या अनुभवाने मात्र 60 दिवसात कलिंगडाचे पीक काढणीसाठी तयार केले. दोन महिन्यातच श्रीकांत यांचे कलिंगड पाच ते सहा किलो वजनाचे तयार झाले.

कलिंगडाचे पीक पूर्ण विकसित झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी बांधावर येऊन साडेतेरा रुपये प्रति किलो या दराने श्रीकांत यांच्या कलिंगडची खरेदी केली. व्यापारी यांच्या मते, श्रीकांत यांनी लावलेल्या या जातीचे कलिंगड चवीला अतिशय गोड असून लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी टिकवणक्षमता अधिक असल्याने अधिक फायद्याचे आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून श्रीकांत यांच्या कलिंगडला मोठी मागणी आहे. कलिंगडाचे पीक उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, हिवाळ्यात कलिंगडची लागवड करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे आहे मात्र ही जोखीम अंगीकारून श्रीकांत यांनी हिवाळ्यात कलिंगडचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले. श्रीकांत यांनी दीड एकर क्षेत्रात सुमारे 45 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे युनिको कंपनीने त्यांचा सत्कार देखील केला. युनिको कंपनीने शैलेश मुंजे व श्रीकांत या पिता-पुत्रांचा मोठ्या थाटामाटात सत्कार केला. त्यांचे हे नेत्रदीपक यश बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या बांधावर हजेरी देखील लावून गेले आहेत.

English Summary: Made Ray Bhava! This newwood farmer planted Kalingad and earned only 60 days of Rs 6 lakhs
Published on: 19 February 2022, 10:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)