Success Stories

शेतकऱ्यांच्या जीवनात जून महिना म्हटलं म्हणजे एक पर्वणीच असते. जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पूर्व तयारी अगदी जोरात चालू असते. एकदा की पावसाचे आगमन झाले की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते.

Updated on 04 July, 2021 7:37 AM IST

 शेतकऱ्यांच्या जीवनात जून महिना म्हटलं म्हणजे एक पर्वणीच असते. जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पूर्व  तयारी अगदी जोरात चालू असते. एकदा की पावसाचे आगमन झाले की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते.

 शेतकरी पेरणी साठी आपल्या परंपरागत बैलजोडी चा वापर करतात किंवा  काही शेतकरी ट्रॅक्टर च्या सहाय्याने  पेरणी करतात. तसेच पेरणीच्या बर्‍याच पद्धती असतात. त्या पद्धती पिकांपरत्वे बदलत असतात. काही पिकांची लागवडही टोकण पद्धतीने केली जाते. परंतु बाजरी, ज्वारी, भुईमूग इत्यादी  पिकांच्या पेरणीसाठी बैलजोडी अथवा ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राचा वापर केला जातो. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही यंत्राचा वापर करणे शक्य होत नाही.

 हीच परिस्थिती मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील तरुण शेतकरी कमलेश घुमरे व एकंदरीत  त्यांच्या कुटुंबाची होती. कमलेश घुमरे त्यांच्या आई आणि वडिलांना होणारा त्रास पाहून तो सहन करू शकले नाही. मग त्यांनी टाकाऊ वस्तु पासून पेरणी यंत्र बनवले.

 कमलेश घुमरे यांनी बनवलेले हे यंत्र सहज उपलब्ध होणार्‍या टाकाऊ वस्तु पासून घरच्या घरी तयार केले आहे. त्यांनी तयार केलेल्या या यंत्राचे वैशिष्ट्य मध्ये अगदी हलके वजनाचे असून त्याची किंमतही फार कमी आहे. या यंत्राच्या साह्याने कपाशी, मका, भुईमूग यासारखे पिकांची पेरणी सहजपणे करता येते.

या यंत्राच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे होणारे कष्ट, तसेच वेळ वाचणार आहे. तसेच मजुरांची टंचाई आहे त्यावर देखील या यंत्राच्या साह्याने मात करता येणार असल्याचे कमलेश घुमरे यांनी सांगितले. त्यांनी या यंत्रासाठी पाण्याची रिकामी बाटली, वायर, पाईप इत्यादी टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.

 या यंत्राची वैशिष्ट्ये

 कमलेश घुमरे यांनी बनवलेले या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे कष्ट खूपच कमी होणार आहेत. तसेच या यंत्राच्या वापरामुळेशेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ आणि पैसाही वाचणार आहे. कमलेश घुमरे यांनी बनवलेल्या पेरणी यंत्रामुळे ज्या  पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना वाकून काम करावे लागते. हा वाकून होणारा त्रास शेतकऱ्यांचा वाचणार आहे.

English Summary: made a cultivation machine with useless articles
Published on: 03 July 2021, 09:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)