शेती व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून मोठा बदल पहायला मिळत आहे. शेतकरी बंधू पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक शेतीची कास धरत आहे. शिवाय काळानुसार पीकपद्धतीत बदल करीत आहेत. त्यातून त्यांना दर्जावान उत्पन्न मिळते. आपल्या राज्यात असे कितीतरी शेतकरी बंधू आहेत त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती व्यवसायात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.
सध्या राज्यात फुल शेती करण्याकडे बरेच वळत आहेत. फुलशेतीच्या माध्यमातून शेतकरी बंधूना चांगले लाखोंचं उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी वर्ग या फुलशेतीला प्राधान्य देताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील या फुलशेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव विशेष करून फुल शेतीसाठी प्रसिद्ध आहे. दिवेगाव हे फुल शेतीसाठी विशेष ओळखले जाते. या गावात जेरबेराचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते.
या गावातील अनेक शेतकरी पॉलिहाऊस च्या मदतीने फुल शेती करू लागले आहेत. शेती व्यवसायात काळानुसार बदल करणे अनिवार्य आहे. आणि ही
बाब दिवे गाव येथील शेतकऱ्यांना उमजली. पीकपद्धतीत बदल यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना चांगलाच लाखोंचा नफा मिळू लागला आहे. अशीच एक यशोगाथा दिवे गाव मधून समोर येत आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कृषी विद्यापीठांना मिळणार कोट्यावधींचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा
राहुल आणि सचिन झेंडे या दोन्ही भावांनी फुलशेतीमधून लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. जरबेरा फुलशेतीमध्ये काळानुसार नवनवीन बदल करीत हे दोघे भावंडे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा स्रोत बनले आहे. खरंतर प्रत्येक यशामागे तितकेच खडतर प्रयत्न घेतलेले असतात. पुरंदर तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात तर अवस्था अधिकच बिकट होते.
मात्र या दोघांनी या परिस्थितीवर देखील मात केली. या दोन भावंडांनी पाणीटंचाईवर समाधान शोधत थेट शेततळ्यांचीच उभारणी केली. पावसाळ्यात हे शेततळे भरून ठेवण्यात येते व उन्हाळ्यात याच शेततळ्याच्या पाण्यातून जरबेराची शेती फुलवण्यात येते. या कामात त्यांच्या कुटुंबाचा देखील मोलाचा वाटा आहे. जरबेरा फुलाला बाजारात चांगलीच मागणी आहे. बुके तयार करण्यापासून ते लग्नसमारंभात तसेच अन्य छोट्या-मोठ्या कार्यक्रममध्येदेखील सजावटीसाठी सर्वाधिक जरबेरा फुलाचा वापर केला जातो.
सेंद्रिय खतांचा वापर
सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. मात्र या दोघांनी रासायनिक खतांना फाटा सेंद्रिय खतांचा वापर करून जरबेरा फुलशेती केली. याचा त्यांना बराच फायदा झाला आहे. जरबेरा फुलांची गुणवत्ता सुधारली असून उत्पादनातदेखील वाढ झाली आहे. शिवाय सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे आरोग्यदेखील अबाधित राहण्यास मदत होत आहे. खरंच हे दोन्ही भावंडे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अखेर मोदींनी 'ती' घोषणा केलीच; खात्यावर होणार उद्याच पैसे जमा
आता धान उत्पादकांचा प्रश्न मिटणार; विजय वडेट्टीवार यांचे मोदी सरकारला पत्र
Published on: 30 May 2022, 03:08 IST