व्यवसाय ही एक अशी गोष्ट आहे की, ज्यामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही अपार कष्ट घेऊन स्वतःला आणि कुटुंबाला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकता. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायद्दल आयडिया (Business Idea) देणार आहोत. तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी भांडवलात सुरु करू शकता. आपण स्नॅक्स अर्थात नमकीनच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊ काही सविस्तर माहीती.
आपल्या आजूबाजूच्या बाजारात खूप प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत. पण जर तुम्ही चव, क्वालिटी, क्वांटीटी देऊन आकर्षक पॅकिंग करून नमकीन विकले तर तुम्ही काही दिवसांतच खूप पैसा कमवू शकतात.
यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, आपण करत असलेल्या व्यवसायात आपल्याला कच्च्या मालापासून नमकीन तयार करण्याचा खर्च, विज बिलाचा, पॅकिंगचा आणि वाहूतुकीचा खर्च किती येईल हे पाहाव व्यवसाय सुरू करताना. नमकीन अर्थात फरसाण तयार करण्यासाठी सेव (शेव) मेकिंग मशीन, मिक्सिंग मशीन, फ्रायर मशिन, पॅकेजिंग व वजनाचे यंत्र यांची गरज आहे.आता छोटे दुकान किंवा कारखाना सुरू करायचा असेल तर 300 चौरस फूट ते 500 चौरस फूट एवढी जागा तुमच्याकडे पाहिजे आहे.
महत्वाचं म्हणजे कारखाना उभारायचा असेल तर अनेक शासकीय परवानग्या मिळवाव्या लागतील. उदाहरणार्थ, अन्न परवाना, एमएसएमई नोंदणी आणि जीएसटी नोंदणी असं बरंच काही करावं लागेल.कच्चा माल काय-काय लागेल?
मसाले, बेसन, तेल, शेंगदाणे, मैदा, मीठ, मसूर, मूग डाळ या गोष्टी लागतील. तुमच्या गरजेपेक्षा जास्त गोष्टी वाढवताना त्याचे टेस्टिंग करून घ्या किंवा त्या गोष्टींमुळे पदार्थ खराब होईल का हे काही दिवस तपासा. तुम्ही काम वाढवलं की 1-3 कामगार देखील या व्यवसायासाठी लागू शकतात. तुम्हाला मशीनमुळे विजेचा जास्त खर्च येऊ शकतो, तसं वीज कनेक्शन लागेल आणि तो खर्च कसा कमी ठेवता येईल त्याचे नियोजन करा.
त्यानंतर स्वतःचं दुकान तुम्ही याच्या विक्रीसाठी वापरू शकता. नाहीतर तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्ही योग्य किंमतीमध्ये इतर किराणा दुकान, मॉल, एखाद्या कार्यक्रमात, हॉटेल्समध्ये सप्लाय सुद्धा करू शकता.
तुमची कमाई किती होईल?
कोणताही व्यवसाय असला म्हणजे आपण त्यातून मिळणारा फायदा बघतो. पण खर्च बघताना आपण काम करणाऱ्या घरातील व्यक्ती किंवा कामगार आणि स्वतःचा पगार देखील त्यात समाविष्ट करायला हवा. कारण तुमच्या कष्टाची देखील काही किंमत देणं गरजेचं असते. हा संपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 लाख आणि जास्तीत जास्त 6 लाख रुपये एवढी रक्कम लागू शकेल. यानंतर, तुम्ही काही दिवसात खर्चाच्या सुमारे 20 ते 30 टक्के नफा कमवू शकता. यामध्ये तुम्ही क्वालिटी कशी ठेवाल यावर तुमच्या नफ्याची टक्केवारी ठरणार असते.
Published on: 19 April 2022, 10:09 IST