आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोक काम - धंदयासाठी(business) एका जागेतून दुसरीकडे स्थलांतर होतात जे की आपले गाव सोडून दुसऱ्या गावी जातात. उत्तराखंड म्हणजे डोंगराळ राज्य आले तिकडे सुद्धा असेच आहे की तेथील लोक कामासाठी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये येतात. परंतु आत्ता आयटी कंपनी मध्ये काम करणारी महिला हिरेशा वर्मा यांच्यामुळे तेथील राज्यातील ग्रामीण लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे जे की हिरेशा वर्मा या महिलेने तेथील लोकांना मशुरूमची लागवड तसेच तंत्रज्ञानाशी जोडून आधुनिक प्रक्रिया जोडून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
हिरेशा वर्मांच्या कामाची सुरुवात कशी झाली:-
हिरेशा वर्मा यांनी २०१३ मध्ये ऑयस्टर मशरूम च्या २५ पिशव्या फक्त दोन हजार रुपये ला विकत घेतल्या होत्या त्यामधून त्यांनी ५ हजार रुपये कमावले. त्यानंतर त्यांनी दुधाळ मशरूम ची लागवड केली त्यामध्ये सुद्धा त्यांना चांगले यश मिळाले. त्यांना चांगले यश मिळाल्यामुळे मशरूम ची लागवड सुरू केली. हिरेशा वर्मा यांनी डेहराडून मधील कृषी विज्ञान केंद्रातून विविध जातीच्या मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेतले.
हेही वाचा:जळगावच्या पाटील बंधूंचा डाळिंबाच्या शेतीमधून ५० लाखांचा टर्नओव्हर
२०१४ मध्ये प्रशिक्षण घेतलं:-
हिरेशा वर्मा यांनी २०१४ मध्ये मशरूम संशोधन संचालय, सोलन, हिमाचल प्रदेश मधून प्रशिक्षण घेतले. मशरूम विभाग डेहराडून खते तसेच बियाणे NHM व NHB आर्थिक मदतीसाठी संपर्क केला. डेहराडून मधील एका गावात तीन बांबूची शेड उभा केली जे की त्यामध्ये ५०० पिशव्या ठेवता येतील.हिरेशा वर्मा यांनी ऑयस्टर मशरूम ची लागवड करून दोन वेळा त्यामधून चांगले उत्पन्न काढले जे की त्यास लागणारे योग्य तापमान ठेवून दोन वर्षे हंगामी लागवड केली. दोन वेळा उत्पन्न काढता नंतर त्यांनी वेगवगेल्या संस्थाकडून मशरूम लागवडीबद्धल तांत्रिक माहिती सुद्धा घेतली. पुढील काळात त्यांनी २० किलो मशरूम चे उत्पादन घेतले व त्या चांगल्या प्रकारे आणि फायद्यात राहिल्या त्यामुळे एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिरेशा वर्मा यांनी मशरूम च्या शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पादन काढले आहे.
आत्ता पर्यंत 2000 लोकांना प्रशिक्षण:-
हिरेशा वर्मा यांनी अत्ता मशरूम च्या उत्पादनामध्ये चांगलाच हात बसवला आहे जे की प्रतिदिन १००० किलो उत्पादन क्षमेतच्या त्यांच्या शेतामध्ये १० वातानुकूलित खोल्या आहेत त्या खोल्यांमध्ये वर्षभर मशरूम चे उत्पादन सुरूच असते.त्या दहा खोल्यांमध्ये १५ लोक नेहमी काम करत असतात, एवढेच नाही तर आत्ता पर्यंत हिरेशा वर्मा यांनी जवळपास २००० महिला व शेतकऱ्यांना मशरूम लागवड कशी करावी याबद्धल प्रशिक्षण सुद्धा दिलेले आहे. सध्या पहायला गेले तर हिरेशा वर्मा औषधी मशरूम ची लागवड करत आहेत.
Published on: 08 August 2021, 04:51 IST