सध्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी कष्ट करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे एवढाच शेतकऱ्याचा उद्देश असतो. बळीराजा काबाडकष्ट करून दगडावर सुद्धा पीक फुलवू शकतो. कारण काबाडकष्ट करायची तयारी बळीराज्यात असते.आजपर्यंत आपण अनेक शेतकरी सक्सेस च्या कहाण्या ऐकल्या असतील परंतु चक्क मराठवाड्यातील शेतकऱ्याने नापीक 20 गुंठे जमिनीतून मिरचीची लागवड करून लाखो रुपये कमावले आहेत. त्यामुळं सभोवताली च्या भागात या शेतकऱ्यांच्या नावाचा डंका वाजत आहे.
पडीक 20 गुंठे क्षेत्रावर मिरची लागवड :
राज्यातील बहुतांशी शेतकरी भुसार पिकांकडून भाजीपाला शेतीकडे वळाले आहेत कारण भुसार पिकातून मिळणारे उत्पन्न हे भाजीपाल्यापेक्षा खूप कमी आहे शिवाय भुसार पिकाला कष्ट सुद्धा मोठ्या प्रमाणावर करावे लागते. त्यामुळे असंख्य शेतकरी भाजीपाला लागवड करत आहेत.महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फक्त आणि फक्त दुष्काळ आणि कमी पाऊस. परंतु मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील वारूळ बारुळ गावातील शिवकांत इंगळे या शेतकऱ्याने पडीक 20 गुंठे क्षेत्रावर मिरची लागवड करून 2 लाख रुपये कमावले आहेत.
शिवकांत इंगळे हे एका खाजगी कंपनी मध्ये काम करत होते. कंपनीतून मिळणाऱ्या पगारावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडण्याचे ठरवले. नोकरी ला कंटाळलेले शिवकांत इंगळे यांनी गावाला आल्यावर शेती करण्याचा विचार केला आणि पडीक 20 गुंठे क्षेत्रावर स्पायसी मिरची ची लागवड केली. मिरचीच्या पहिल्याच तोड्याला शिवकांत इंगळे यांना 25 हजार रुपयांचा फायदा झाला.
यातच त्यांचा सर्व खर्च निघाला. या साठी शिवकांत इंगळे यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी भाजीपाला लागवड करून त्यातूनच बक्कळ नफा मिळवत आहेत आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत.
Published on: 03 February 2022, 06:58 IST