बिटेक चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यूपी राज्यातील फारुदाबाद तालुक्यामधील हिमांशू गंगावर यांनी नैसर्गिक शेतीच्या आधारे आपला स्टार्टअप सुरू केला आहे जे की यामधून ते १४-१५ लाख रुपये कमवत आहेत. हिमांशू यांनी २५०० रुपयांची नोकरी सोडली आहे जे की आज त्यांच्या कंपनीत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. २० डिंसेबर रोजी लखनऊ येथे झिरो बजेट नैसर्गिक शेती चे जे शिबिर सुरू होणार आहे त्यामध्ये परदेशात येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीबद्धल गुणवत्ता शिकवली जाणार आहेत असे हिमांशू ने दैनिक भास्कर शी बोलताना सांगितले.
२५०० रुपये वर सोडली नोकरी :-
हिमांशू ने आपला अनुभव शेअर करत सांगितले की मी १९९३ मध्ये नागपूरच्या आरईसी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. १९९४ - ९६ दरम्यान मी लखनऊ च्या सार्वजनिक उद्योजकता विभागात ३ वर्षे २५०० रुपये पगारावर असिस्टंट कोऑर्डिनेटर या पदावर काम केले. १९९६ साली नोकरी सोडून मी पेंटागॉन स्क्रू आणि फास्टर लिमिटेड कंपनीत नोकरी सुरू केली मात्र तिथे कमी पगार असल्यामुळे १९९८ साली मी तेथील नोकरी सोडली आणि गावी जाण्याचा निर्णय घेतला.
बी.टेक केल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतल्याने घरच्यांना आला राग :-
जेव्हा मी नोकरी सोडून गावी शेती करायला आलो त्यावेळी माझी आई माझ्या निर्णयावर अजिबात खूश नव्हती त्यांना वाटत होते की माझ्यासाठी शेतीपेक्षा नोकरीच चांगली असेल. मी माझ्या आईचे न ऐकता परदेशी पुस्तक वाचून शेती करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा माझे खूप नुकसान झाले मात्र मी माझे प्रयत्न चालू ठेवले. माझ्या या निर्णयावर माझे वडील व भाऊ खुश होते. या दोघांनी मला शेती करण्यास प्रोत्साहन केले.
आयुष्यात असा यू टर्न :-
२०११ साली मी सुभाष भालेकर जे की नैसर्गिक शेती पद्धतीचे जनक मानले जातात. त्यांना दिल्लीमध्ये भेटलो. सुभाषजी यांनी मला झिरो बजेट शेतीविषयी माहिती सांगितले जे की मी ती पद्धत अमलात आणली. एका वर्षात माझा एक लाख रुपयांवर नफा पोहचला तर आता २० एकरात प्रति वर्ष १२ लाख रुपयांचा नफा मिळत आहे. माझे हे यश पाहून शेजारी राहायला असणारे सुद्धा शेती करू लागलेत तसेच माझा जुळा भाऊ सुद्धा मला शेती करण्यास मदत करतो.
लग्नासाठी आधी कोणी तयार नव्हते :-
बिटेक करून नोकरी सोडल्याने मी शेती करत होतो त्यामुळे कोण मुलगी द्यायला तयार होत न्हवते. त्यांना असे वाटायचे की शेतकरी मुलासोबत मुलगी खुश राहणार नाही. या परिस्थितीत मी नाराज न होता काम सुरूच ठेवले. वयाच्या ३५ व्या वर्षी माझे लग्न झाले. जसे माझे झाले तसेच माझ्या भावाचे झाले.
आता अशा स्टार्ट अप्समधून लाखोंची कमाई होत आहे :-
मी शेती करत करत गुळाचे पॅकिंग चा स्टार्टअप सुद्धा सुरू केला. तसेच मी माझी कंपनी काढून त्यास गौरव गुड असे नाव दिले आहे. एवढेच नाही तर उसाच्या पिकात मूग तसेच मसूर चे पीक घेऊन दुप्पट उत्पन्न घेत आहेत. माझ्या या कामात मला माझा भाऊ सुधांशू , आई आणि माझी पत्नी व सासरेही मदत करतात. मी झिरो बजेट नैसर्गिक शेतीमधून १४ ते १५ लाख रुपयांचा वार्षिक नफा काढत आहे.
Published on: 08 January 2022, 03:48 IST