Success Stories

जर तुम्ही एखाद्या आयटी सेक्टर मध्ये नोकरी करीत आहात. समाजामध्ये तुमची एक वेगळी प्रतिमा आहे. ज्यामधून तुम्ही स्वतःला बाहेर काढू इच्छित नाही आणि अशी नोकरी सोडून तुम्ही काही वेगळे करण्याची इच्छा सुद्धा ठेऊ शकत नाही. आजही आपल्या देशामध्ये असे बरेच लोक आहेत की ते आपल्या 9 ते 5 असलेल्या जीवनात खूप खुश असतात.

Updated on 14 November, 2021 1:26 PM IST

जर तुम्ही एखाद्या आयटी सेक्टर मध्ये नोकरी करीत आहात. समाजामध्ये तुमची एक वेगळी प्रतिमा आहे. ज्यामधून तुम्ही स्वतःला बाहेर काढू इच्छित नाही आणि अशी नोकरी सोडून तुम्ही काही वेगळे करण्याची इच्छा सुद्धा ठेऊ शकत नाही. आजही आपल्या देशामध्ये असे बरेच लोक आहेत की ते आपल्या 9 ते 5 असलेल्या जीवनात खूप खुश असतात.

.या आधारे स्वतःचे जीवन व्यतीत करत असतात.परंतु मागच्या वर्षी पासून आलेल्या कोरोनामुळेअनेकजणांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागले.बरेच लोक काही मार्ग दिसत नसल्यामुळे वेगळ्या प्रकारचे मार्ग शोधत होते.कोरोना  काळामुळे काही नवीन करण्याची संधी मिळाली. अशीच एक यशस्वीतेची कहाणी या लेखात घेऊन आलो आहोत.

 कृषी जागरणचीटीम पोहोचली ग्रेटर नोएडा मध्ये

कृषीजागरण ची टीम आणि विवेक कुमार राय सहसंपादक कृषी जागरण एक वेळ पुन्हा शेतकऱ्यांच्या मध्ये पोहोचले. तेही ग्रेटर नोएडा येथे. ग्रेटर नोएडा मध्ये  पाहिले तर मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती आणि मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या पाहायला मिळतात. परंतु ग्रेटर नोएडा मध्ये राहून कशा पद्धतीने राखी सिंह यांनी ऑरगॅनिक फार्मिंग मध्ये आपले करिअर बनवले.

राखी सिंह या आयटी कंपनीत नोकरीला होत्या.त्यानंतर त्यांनी ऑरगॅनिक फार्मिंग या  क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. यशस्वी शेतकऱ्यांच्या शोधार्थ जेव्हाकृषी जागरण ची टीम निघाली.तेव्हा टीम ची भेट ऊर्जा ऑरगॅनिक फार्म च्या मालक राखी सिंह यांच्यासोबत झाली. राखी सिंह या दहा एकर जमिनीवर इंटिग्रेटेड फार्मिंग,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. या जमिनीत ए आंबा,केळी,जांभूळ,पपई या फळ पिकांसोबतच हंगामी फळ,विविध प्रकारचा भाजीपाला,तुर्णधान्य आणि कडधान्य यांचीही शेती करतात. ही संपूर्ण पिके ते फक्त ऑरगॅनिक पद्धतीने घेतात. वाढते तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या मदतीने आज कुठलीही गोष्ट शक्य होत आहे. पारंपरिक शेतीचा विचार केला तर या पद्धतीत आजही शेतकऱ्याला द्वारे एका हंगामात फक्त एकच पीक घेतले जाते.

यामध्ये जास्तीत जास्त खर्च येतो आणि उत्पन्न कमी मिळते. राखी याबाबतीत म्हणाल्या की, इंटिग्रेटेड फार्मिंग हा एक असा प्रकार आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना फायदा होण्याचे चान्सेस जास्त असतात.इंटिग्रेटेड फार्मिंग मध्ये तुम्ही एका जागेत विविधप्रकारच्या पिकांची लागवड करू शकता. यामध्ये तुम्ही एकाच वेळी दिलेल्या पाण्यामध्ये आणि खाद्यामध्ये सगळ्या प्रकारचे पिकांची गरज भागवू शकता.

खतांच्या बाबतीत चर्चा करताना राखी सिहम्हणाल्या की,  कोणत्याहीपद्धतीने रासायनिक खतांचा प्रयोग न करता ऑरगॅनिक खतांचा वापर करतात. खतांच्या बाबतीत माहिती देताना त्यांनी म्हटले की गाईचे शेण आणि गोमूत्र  यांच्या मदतीने खत तयार केले जाते व याचा वापर पिकांसाठी करण्यात येतो.एवढेच नाही तर कीटक नाशकसुद्धा  ते स्वतः तयार करतात.

ज्यामध्ये कॅस्टर,निम,हिरवी मिरची, आले आणि लसूण याचा वापर करतात.याची पिकांवर फवारणी केल्यामुळे कीटकांपासून सुद्धापिकांनावाचविता येते. या फवारणी पासून पिकांना कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.आजकाल बरेचजण केमिकल विरहित भाजीपाला घेणे पसंत करतात.त्यामुळे बाजारांमध्ये ऑरगॅनिक प्रॉडक्टची मागणी खूप वाढत आहे.

 एवढेच नाही तर राखी सिंह या या फळ आणि भाजीपाल्याच्या उत्पन्ना मधून चांगला नफा कमवत आहेत.त्यांनी सांगितले कीभाजी मार्केटमध्येया पिकांची चांगली किंमत नाही मिळाली तर त्यांनाविक्रीसाठी एक स्टेप पुढे घेऊन जावे लागते. म्हणजे फूड  प्रोसेसिंग उद्योगाचा आधार घ्यावा लागतो.

English Summary: leave it sector job and start integreted farming and organic farming
Published on: 14 November 2021, 01:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)