शेतकरी वर्ग अत्ता आपल्या शेतीमध्ये पारंपरिक पीक घेण्या ऐवजी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून उत्पन्न घेण्याचे मार्ग शोधत आहे.कारण पारंपरिक पीक लावून त्या लागवडीसाठी जो खर्च जातो तो सुद्धा निघत नसल्याने शेतकरी नेहमी संताप व्यक्त करतो आणि त्यात वन्य प्राणी असले की त्यांची वेगळीच भीती असते जे प्राणी पूर्ण पिकाचे नुकसान करतात. त्यामुळे अत्ता शेतकरी वेगवेगळे प्रयोग वापरून शेती करण्यास प्राधान्य देत आहे.
फुल शेतीला पैसे कमी आणि उत्पन्न जास्त :
सध्याच्या युगात जर पहिला गेले तर शेतकरी वर्गाने फुल शेतीकडे ओळणे फार गरजेचे आहे असे फुलशेती पुरस्कारप्राप्त सुभाष भट्टे यांनी सांगितले आहे. आजच्या काळात बाजारात सुदधा फुलशेतील मोठी मागणी असल्याचे त्यांनी संगितले. आणि फक्त विशेष बाब म्हणजे फुल शेतीला पैसे कमी आणि उत्पन्न जास्त निघण्याचे नेहमी धोरण ठरलेले असते. बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या फुलशेतीमधून तुम्ही लाखो रुपयांची उलाढाल करू शकता असे सांगितले आहे.
हेही वाचा:असे करा रब्बी हंगामात हुमनी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
आपण रोजच्या जीवनात फुलांचा उपयोग कोणत्या न कोणत्या कारणांसाठी करतोच जे की या फुलशेती मधील फुलांना मोठे मार्केट सुदधा आहे. शहरातील जास्तीत जास्त ग्राहकांची मागणी फुलांना वाढलेली आहे हे लक्षात घेता शेतकरी वर्गाने फुलशेती करावी असे सांगण्यात आलेले आहे. फुलशेती साठी मुंबई ही बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेतकरी वर्गाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे जे की मुंबई मार्केट मध्ये फुलांना खूप मागणी आहे आणि हीच फुले बाहेरच्या देशात सुद्धा विक्रीसाठी पाठवली जातात त्यामुळे फुलशेती उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.सध्या वसई तालुक्यात सोनचाफा व पिवळा चाफा ला खूप मोठी मागणी आहे याव्यतिरिक्त आंतरपीक म्हणून तुळस, सुरण व आळु ची पाने याना सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मध्ये ग्राहकांची मागणी आहे. फुल शेती मधील सर्वात मोठे उत्पन्न देणारे फुल म्हणजे पिवळा चाफा.
कारण पिवळा चाफा हे असे एक फुल आहे ज्याला बाजारात खूप मोठी मागणी आहे आणि त्यावर कोणातच रोग पडत नाही.त्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा आपल्या शेतामध्ये पिवळा चाफा लावतात. तसेच जास्वंदीच्या फुलांची जरी शेतकऱ्याने शेती केली तर त्यामधून सुद्धा शेतकऱ्याला दोन पैसे जास्त भेटू शकतात.प्रत्येक कार्यक्रमात फुलांचा वापर केला जातो जसे की वाढदिवस असो किंवा लग्न सराईत असो, वेगवेगळ्या फुलांचा गुच्छ करून एकमेकांना भेट देणे हे सुद्धा कार्यक्रमात चालते त्यामुळे जिकडे तिकडे फुलांना खूप मोठी मागणी आहे. शेतकरी वर्गाने फुलशेतीकडे ओळणे गरजेचे आहे.
Published on: 29 August 2021, 06:38 IST