Success Stories

शेती करायची म्हटल की सर्वात महत्वाचे शेतीला आवश्यक असणारे म्हणजे योग्य जमीन, मुबलक पाणी आणि खत या 3 घटकांवर शेती अवलंबून असते शिवाय कष्ट करण्याची तयारी तेव्हाच आपण शेतीमधून जोरदार उत्पन्न मिळवू शकतो. या लेखात आम्ही अश्या व्यक्ती बद्दल सांगणार आहोत ज्याने शेती करारावर म्हणजेच भाड्याने घेऊन बक्कळ नफा मिळवून प्रगती साधली आहे.

Updated on 22 September, 2022 4:42 PM IST

शेती करायची म्हटल की सर्वात महत्वाचे शेतीला आवश्यक असणारे म्हणजे योग्य जमीन, मुबलक पाणी आणि खत या 3 घटकांवर शेती अवलंबून असते शिवाय कष्ट करण्याची तयारी तेव्हाच आपण शेतीमधून जोरदार उत्पन्न मिळवू शकतो. या लेखात आम्ही अश्या व्यक्ती बद्दल सांगणार आहोत ज्याने शेती करारावर म्हणजेच भाड्याने घेऊन बक्कळ नफा मिळवून प्रगती साधली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या शहरापासून अवघ्या 3 किलोमिटर असलेले बांबुळी गाव हे नैसर्गिक साधनसंपत्ती ने परिपूर्ण आहे. याच छोट्याश्या गावात राहणारे नारायण तुकाराम चेंदवणकर हे प्रगतशील शेतकरी, यांच्या वडिलांचे निधन हे ते अवघे 6 वर्षाचे असताना झाले त्यानंतर त्याच्या एका नातेवाईकाने शाळेसाठी त्यांना मुंबई ला नेले त्यांनी मुबई मध्ये कसेबसे 10 पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण झाल्यावर त्यांनी मुंबई मद्ये नोकरी करण्यास सुरुवात केली 5 ते 6 वर्षे त्यांनी मुंबई मध्ये नोकरी केली. नंतर 2000 साली ते आपल्या मूळ गावी आले गावी आल्यानंतर त्यांना गोवा येथे नवीन नोकरी लागली परंतु यातून मिळणाऱ्या मानधनातून त्यांचा खर्च सुद्धा भागात नसल्यामुळे त्यांनी नोकरी सोडून देण्याचे ठरवले. नोकरी सोडल्यानंतर त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या मदतीने त्यांनी करारावर जमीन घेऊन भाजीपाला उत्पादनासह मधमाशीपालन यशस्वी केले आहे.

हेही वाचा:-राज्यात दिवाळी आणि दसऱ्यामुळे बेदाण्याच्या दरात सुधारणा, बाजारात सुद्धा प्रचंड मागणी.

 

घरची एक गुंठा सुद्धा जमीन नसल्यामुळे त्यांना शेती करारावर घ्यावी लागली. सुरुवातीलाच त्यांनी 1 एकर माळरान करारावर घेतली आणि त्यामधे वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली त्या एक एकर क्षेत्रामध्ये त्यांनी दोडका, पडवळ, काकडी, मिरची, कारली, भोपळा, वाल, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. त्यातून वर्षाला साधारण दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळते. तसेच फावल्या वेळेत ते अन्य शेतकरी वर्गाच्या बांधावर जाऊन वेगवेगळ्या पिकांची माहिती सुद्धा जाणून घेत असे. भाजीपाला शेतीमधून चांगले उत्पन्न मिळू लागल्यावर नारायणराव यांचा शेतीमधील रस अजून वाढला. ते विविध ठिकाणी शेतीप्रयोग बघण्यासाठी जात असे शिवाय अनेक गोष्टी त्यातून ते शिकू लागले. याच दरम्यान त्यांनी भाजीपाला शेतीरोबरच मधमशिपलान करण्याचे ठरवले.

हेही वाचा:-गुलाबी आणि पांढऱ्या पेरूमध्ये काय आहे फरक? चांगल्या आरोग्यासाठी करा या पेरुचे सेवन.

 

2016 मद्ये त्यांनी पुण्यात येऊन मधमाशीपालनाचे प्रशिक्षण घेतले. व त्यानंतर त्यांनी सांगली हून 4 मधमाशांच्या पेट्या आणल्या. अनुभव नसल्यामुळे त्या 4 ही पेट्या खराब झाल्या परंतु हार न मानता नव्याने सुरुवात केली. पुन्हा ८ महिन्यांनंतर ५ पेट्या मागविल्या. या पेट्यादेखील घराजवळील भाजीपाला लागवडीत ठेवल्या. वेळोवेळी फळभाज्यांचे निरीक्षण केले. उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याचे निर्दशनास आले. सध्या त्यांच्याकडे मधमाशांच्या सुमारे २५ पेट्या आहेत. शिवाय आता त्यांना मधमाशीपालनातून वर्षाकाठी साधारण ८० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते.

English Summary: Landless farmer makes progress by farming on nominal contract, read details
Published on: 22 September 2022, 04:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)