Success Stories

देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेती क्षेत्रात मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे.

Updated on 28 March, 2022 12:15 PM IST

देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेती क्षेत्रात मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव आता आधुनिकतेची कास धरून चांगला नफा मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करीत आहेत. केसर देखील एक चांगला नफा मिळवून देणारे पीक आहे. मात्र असे असले तरी याची लागवड जगात सर्वात जास्त इराणमध्ये होते आणि भारतात याची लागवड खूपच नगण्य आहे. भारतातील जम्मू आणि कश्मीर या प्रदेशात केसरची लागवड लक्षणीय बघायला मिळते. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत उगवला जाणारा केसर आता देशातील इतर प्रदेशात देखील लावला जाऊ लागला आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केसर ची मागणी बाजारात कायम बघायला मिळते,

आणि केसरला बाजार भाव देखील नेहमीच अधिक असतो. केसर ची किंमत बाजारात कधीच कमी होत नाही म्हणुनच की काय केसरला लाल सोन म्हणुन संबोधले जाते. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, आता बाजारात केसर जवळपास एक ते दीड लाख रुपये किलोने विक्री होत आहे.

त्यामुळे याची लागवड शेतकऱ्यांना करोडो रुपये नफा मिळवुन देऊ शकते असा दावा केला जातो. मात्र, असे असले तरी, केशर पिकाची सुरुवातीपासूनच विशेष काळजी घ्यावी लागते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या पिकाचे बियाणे 15 वर्षांतून एकदाच पेरले जाते. दरवर्षी त्यात फुले येतात आणि या फुलांमधून केशर काढले जाते. केसरला एक फूल लागते आणि एका फुलाच्या आत

पानांच्या मध्यभागी आणखी 6 पाने निघतात, यामध्ये केशराची दोन-तीन पाने असतात, ज्याचा रंग लाल असतो. त्याचबरोबर तीन पाने पिवळ्या रंगाची असून, त्यांचा काही उपयोग नसतो. केसर पिक अशा ठिकाणी लावण्याचा सल्ला दिला जातो ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश असतो, कारण की केसर भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी वेगाने आणि चांगले वाढते.

थंड आणि आदर्ता असलेल्या ओल्या हवामानात या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याच सांगितलं जाते. हेच कारण आहे की, उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी त्याची लागवड सर्वोत्तम मानली जाते.

या पिकाची लागवड अम्लीय ते तटस्थ, रेव, चिकणमाती आणि वालुकामय जमीनीत करण्याचा सल्ला दिला जातो. केशर लागवड अशा जमिनीत करण्याचा सल्ला दिला जातो ज्या जमिनीचा pH 6 ते 8 या दरम्यान असतो. जर याची लागवड जुलैमध्ये केली तर सुमारे 3 महिन्यांत केसर तयार होते. त्यानंतर याच्या फुलांमधून केशर काढला जाऊ शकतो आणि बाजारात विकता येतो.

त्यामूळे केसर देखील एक चांगला नफा मिळवून देणारे पीक आहे. मात्र असे असले तरी याची लागवड जगात सर्वात जास्त इराणमध्ये होते आणि भारतात याची लागवड खूपच नगण्य आहे. भारतातील जम्मू आणि कश्मीर या प्रदेशात केसरची लागवड लक्षणीय बघायला मिळते. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत उगवला जाणारा केसर आता देशातील इतर प्रदेशात देखील लावला जाऊ लागला आहे.

English Summary: Keshar plantation do and earn earn crore rupees required reach know about
Published on: 28 March 2022, 12:12 IST