बरेच जण त्यांच्या विशिष्ट कार्यामुळे किंवा अतुलनीय कामगिरीमुळे ओळखले जातात. अशा व्यक्तींचे काम करण्याची जी पद्धत असते ती इतरांपेक्षा नक्कीच वेगळी असते. परिस्थितीनुसार पटकन बदल करणे किंवा आहे त्या परिस्थितीत उपलब्ध साधनांचा वापर करुन पुढे जाणे हे खूप महत्त्वाचे असते. हे ज्याला जमून जाते ते नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. जर आपण आजच्या शेतीच्या पद्धतीचा विचार केला तर अगोदर शेतकरी बंधू विविध प्रकारचे पारंपरिक पिके आणि शेती करण्याची पद्धत देखील पारंपारिक अशीच होती.
परंतु आता शेतीच्या विविध दृष्टिकोनातून विकास होऊन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी देखील आता प्रगत झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर आणि कौशल्याचा शिताफीने वापर करून अनन्यसाधारण यश प्राप्त करतात.
कारण एक महत्त्वाचे म्हणजे शेती करीत असताना परिस्थितीनुसार आणि वातावरणानुसार शेतीमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच शेती करण्याच्या पद्धती तसेच विविधपिकांची लागवड यामध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण या लेखामध्ये हरियाणा राज्यातील एका शेतकऱ्याची यशाची कहाणी पाहणार आहोत.
हरियाणातील यशस्वी शेतकरी
हरियाणा राज्यामध्ये असलेल्या सोनीपत जिल्ह्यातील तेरणा या गावाचे रहिवासी असलेले कवल सिंग चौधरी हे प्रगतिशील शेतकरी असून शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करण्याचा कायम सल्ला देतात. जर आपण यांचा प्रवास पाहिला तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये बेबी कॉर्न अर्थात मधुमक्याची लागवड आणि त्यासंबंधीच्या नवनवीन कल्पना यासाठी भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देखील कवल सिंग चव्हाण यांना मिळाला आहे.
त्यांनी शेतीच्या माध्यमातून आणि शेतमालावर विविध प्रकारची प्रक्रिया करून खूप प्रसिद्धी मिळवली असून अगोदर ते भात पीक जास्त करून त्यांच्या शेतामध्ये घ्यायचे. परंतु भातशेतीमध्ये त्यांना अपरिमीत नुकसान झाल्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले होते.
परंतु या सगळ्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी त्यांनी मधुमक्याची लागवड करून उत्तम पद्धतीने शेती सुरू केली. जेव्हा त्यांनी मधुमक्याचे पहिले उत्पादन घेतले त्यावेळी त्यांना दिल्लीतील आजादपुर बाजारपेठेपासून खान मार्केट, सरोजनी मार्केट आणि विविध प्रकारच्या फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये त्यांनी पिकवलेले मधुमका म्हणजेच बेबीकॉर्न विकण्यास सुरुवात केली.
परंतु त्यांनी हे पीक 1999 मध्ये घेतले परंतु त्या वेळी या पिकाला कोणीच खरेदी करत नव्हते. याही समस्यांवर मार्ग काढत त्यांनी स्वतःचे प्रक्रिया युनिट सुरू केली आणि त्यामाध्यमातून स्वीटकॉर्न मशरूम, टोमॅटो आणि मक्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवण्यास सुरुवात केली. जर आपण आजच्या घडीला विचार केला तर ते बेबी कॉर्नचा लागवडी सोबतच त्यावर प्रक्रिया करून चांगला नफा मिळवत आहेत.
जर आपण आजचा त्यांचा विचार केला तर त्यांनी उभारलेल्या विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योगातून हजारो बेरोजगार नागरिकांना रोजगार देखील देण्याचे काम केले आहे. बेबीकॉर्न प्रक्रिया उद्योगासाठी अविकसित किंवा फलित वनस्पतीच्या मधून मका मिळवला जातो.
हा मका पिकातील रेशमी केसांच्या वाढीच्या दोन ते तीन दिवसात बाहेर काढला जातो व त्यामुळे तो बराच मऊ असतो. मधुमक्याची गुणवत्ता ही त्याच्या वयावर अवलंबून असते. हा एक कमी कॅलरीज असलेला आहार असून ज्या माध्यमातून सूप, सॅलड, लोणची, कॅंडी, पकोडा, बर्फी, लाडू तसेच हलवा आणि खिर आदी पदार्थ बनवले जातात.
जर आपण आजचा त्यांचा विचार केला तर त्यांनी उभारलेल्या विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योगातून हजारो बेरोजगार नागरिकांना रोजगार देखील देण्याचे काम केले आहे. बेबीकॉर्न प्रक्रिया उद्योगासाठी अविकसित किंवा फलित वनस्पतीच्या मधून मका मिळवला जातो.
हा मका पिकातील रेशमी केसांच्या वाढीच्या दोन ते तीन दिवसात बाहेर काढला जातो व त्यामुळे तो बराच मऊ असतो. मधुमक्याची गुणवत्ता ही त्याच्या वयावर अवलंबून असते. हा एक कमी कॅलरीज असलेला आहार असून ज्या माध्यमातून सूप, सॅलड, लोणची, कॅंडी, पकोडा, बर्फी, लाडू तसेच हलवा आणि खिर आदी पदार्थ बनवले जातात.
मधुमक्याचा वापर कुठे कुठे होतो?
आज कालच्या लोकांच्या खाण्याच्या बाबतीत विचार केला तर अनेक नवनवीन पदार्थ खायला लोक खूप उत्सुक असतात. यामध्ये बेबी कॉर्नचाही समावेश करता येईल. देशातील मोठ्या शहरांमध्ये याला चांगली मागणी असून याची भाजी देखील तितकीच चविष्ट लागते.
त्यामुळे रेस्टॉरंट पासून ते अनेक फाय स्टार हॉटेल पर्यंत बेबीकॉर्नचा वापर खूप वाढला आहे. तसेच शेतीतून बाजारपेठ शोधत असताना कवल सिंग चौहान यांनी बेबीकॉर्न वर प्रक्रिया सुरू केली. यामध्ये जेव्हा त्यांना हळूहळू नफा मिळू लागला त्यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरी तसेच मशरूम आणि टोमॅटो इत्यादी शेतमालावर प्रक्रिया करून सर्व उत्पादने बनवायला सुरुवात केली.
आजचा प्रवास पाहिला तर या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पादित बेबीकॉर्नची उत्पादने ते भारतात आणि विदेशात देखील निर्यात करतात. त्यांच्या या सगळ्या प्रोसेसिंग युनिट मध्ये स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो प्युरी, बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न आणि मशरूम स्लाईस इत्यादी उत्पादने ते तयार करतात आणि इंग्लंड आणि अमेरिका सारख्या देशांना निर्यात करतात.
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यांनी पिकवलेल्या मालावर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले उत्पादने बाजारात विकली पाहिजे व त्यासाठी शेतकरी गट तयार करणे गरजेचे आहे असा देखील यावेळी पद्मश्री कवल सिंग यांनी नमूद केले.
Published on: 22 October 2022, 04:29 IST