Success Stories

बारामती निंबुत येथील दीपक आणि गणेश या जगताप बंधूंनी माळरानावर अंजिराची बाग फुलवली आहे. यावेळी जगताप बंधूंनी लागवडीपासुन विक्रीपर्यंतची सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध केले आहे.

Updated on 05 January, 2023 10:19 AM IST

बारामती निंबुत येथील दीपक आणि गणेश या जगताप बंधूंनी माळरानावर अंजिराची बाग फुलवली आहे. यावेळी जगताप बंधूंनी लागवडीपासुन विक्रीपर्यंतची सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध केले आहे.

संत्रा, डाळींब, मोसंबी, अंजीर या चारही फळांची एकरभर लागवड करून त्यात अंजीराचे चांगले उत्पादन करता येईल असा अभ्यासातून निष्कर्ष काढल्याचे जगताप यांनी सांगितले. रासायनिक व सेंद्रिय खतांबरोबर जीवामृतचाही वापर ते करतात. लागवडीपासून मार्केटिंगपर्यंत सर्व काही हे जगताप बंधू स्वतः करतात.

अंजीर शेतीच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. त्यामुळे दिपक जगताप यांना २०१८ सासवडमध्ये माजी कृषिमंत्री शरद पवार पवार यांच्या हस्ते अखिल महाराष्ट्र अंजीररत्न हा पुरस्कार देखील मिळाला होता.

भाजीपाल्याचे दर पडले, शेतकरी आर्थिक अडचणीत

तसेच २०१९ मध्ये त्यांना शेती प्रगती कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अंजीर शेतीचा अभ्यास आणि संशोधनाचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी त्यांची अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधक संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

कर्जत- जामखेडमध्ये रोहित पवार की राम शिंदे? कार्यकर्त्यांने लावली 1 लाखाची पैज, चेकही केला जमा

शेती क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविणाऱ्या जगताप बंधूंसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांची सध्या फळी उभी राहिली पाहिजे. असे शेतकरी आपल्या देशात आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.

महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी
कर्नाटकमध्ये ऊस उत्पादकांना FRP पेक्षा 100 रुपये अधिक, महाराष्ट्र का नाही? आता राजू शेट्टी आक्रमक..
या गावात ३०० वर्षांपूर्वीची परंपरा, मातीची घरे आणि चुलीवरचा स्वयंपाक, संपूर्ण गावात एकच फोन..

English Summary: Jagtap brothers flourished fig garden Malrana, everything cultivation sale
Published on: 05 January 2023, 10:19 IST