Success Stories

बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरून शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणे ही काळाची गरज बनली आहे. केवळ पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय करून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न प्राप्त होऊ शकत नाही त्यासाठी शेती क्षेत्रात नवनवीन बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे. केवळ एकच पीक पिकवले तर फक्त त्याच पिकापासून उत्पन्न प्राप्त होऊ शकते मात्र त्याच पिकात आंतरपीक घेतले तर उत्पन्नात भरमसाठ वाढ होण्यास मदत होऊ शकते. याचे एक उत्तम उदाहरण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातुन समोर आले आहे.

Updated on 28 January, 2022 8:12 PM IST

तालुक्यातील मौजे वडगाव कांदळी स्थित रहिवासी शेतकरी नीलकंठ सुखदेव भोर यांनी शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला, बदलत्या काळानुसार पारंपारिक शेती पद्धतीत बदल घडवून आणत या शेतकऱ्याने उसाच्या पिकात फ्लॉवरचे आंतरपीक घेऊन भरमसाठ उत्पन्न प्राप्त केले आहे. या अवलीया शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात 86032 या जातीच्या उसाची लागवड केली, एक एकर क्षेत्रासाठी त्यांना सुमारे सहा हजार रोपांची आवश्यकता भासली. त्यांनी या सहा हजार रोपामध्ये फ्लावरची लागवड करून सुमारे अडीच लाख रुपये कमावले आहेत.

उसाची लागवड केल्यानंतर या शेतकऱ्यांने धवल या जातीच्या फ्लॉवरची लागवड केली. त्यांनी या पिकाच्या दर्जेदार वाढीसाठी रासायनिक तसेच सेंद्रिय खतांची संतुलित मात्रा दिली व यातून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले.

सेंद्रिय खतांमध्ये त्यांनी शेणखत कोंबडीखत त्याचा समावेश केला. तसेच पिकाच्या वाढीसाठी त्यांनी रासायनिक खतांचा देखील प्रभावी वापर केला. योग्य पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन करून अवघ्या दोन महिन्यात फ्लावरचे यशस्वी उत्पादन प्राप्त केले. त्यांनी आपल्या सुयोग्य व्यवस्थापनातून केवळ एक एकर क्षेत्रातून सुमारे 140 क्विंटल दर्जेदार फ्लॉवरचे उत्पादन प्राप्त केले. त्यांनी उत्पादित केलेले फ्लॉवर सुमारे पंचवीस रुपये किलो या प्रमाणे बाजारात विक्री केला. यातून या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वजा जाता सुमारे अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळाला.

उसातून उत्पादन प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागतो, ऊस काढण्यासाठी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागत असतो. तसेच गाळप हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळत असतात. त्यामुळे उसाच्या सुरुवातीपासून त्यामध्ये आंतरपीक घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापासून मोठा फायदा होत असतो. उसाप्रमाणेच इतर पिकात देखील आंतरपीक घेतले जाऊ शकते. राज्यातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या पिकात भाजीपाला आंतरपीक म्हणून लागवड करून चांगला मोठा पैसा बनवताना दिसत आहेत.

English Summary: Intercropping benefits for farmers; Quality flower product grown in Usa
Published on: 28 January 2022, 08:12 IST