Success Stories

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती व्यवसाय हा बारामाही केला जाणारा व्यवसाय. यामध्ये इतर व्यवसायाप्रमाणे काळाच्या ओघात बदल करणे अतिशय महत्त्वाचे असते. कृषी वैज्ञानिक देखील शेतकरी बांधवांना शेतीमध्ये बदल करण्याचा नेहमी सल्ला देत असतात. शेतीमध्ये बदल केला तर निश्चितच यशाला गवसणी घालता येणे शक्य होते.

Updated on 07 May, 2022 11:30 AM IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती व्यवसाय हा बारामाही केला जाणारा व्यवसाय. यामध्ये इतर व्यवसायाप्रमाणे काळाच्या ओघात बदल करणे अतिशय महत्त्वाचे असते. कृषी वैज्ञानिक देखील शेतकरी बांधवांना शेतीमध्ये बदल करण्याचा नेहमी सल्ला देत असतात. शेतीमध्ये बदल केला तर निश्चितच यशाला गवसणी घालता येणे शक्य होते.

या अनुषंगाने देशातील नवयुवक शेतकरी देखील कार्य करत असताना आता बघायला मिळत आहे. देशात सध्या कृषी क्षेत्रात हळूहळू कां होईना क्रांती घडून येतं आहे. शेती क्षेत्रात नवीन क्रांती घडवण्यासाठी अनेक सुशिक्षित तरुण शेतकरी आता पुढे सरसावले आहेत.

सध्या देशातील तरुणाई शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत, जे प्रयोग यशस्वी देखील होत आहेत. शेतीत केलेला बदल हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. झारखंड राज्यातील एका उच्च विद्याविभूषित शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये नवाचार करत चांगले नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

झारखंडच्या दुमका येथील बांकुली पंचायतीच्या मौजे कुमारीखला येथील रहिवाशी शेतकरी चंद्रप्रकाश सिंह यांनी एकात्मिक शेती करत इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवला आहे. हा उच्चविद्याविभूषित अवलिया शेतकरी इंटिग्रेटेड फार्मिंग च्या माध्यमातून सध्या चांगली कमाई करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

कामाची बातमी! मोदी सरकारच्या 'या' योजनेमार्फत सर्व्यांना मिळणार वार्षिक 36 हजार; वाचा या विषयी

लई भारी! नोकरीला लाथ मारली अन शेती सुरु केली; आज करतोय चांगली कमाई

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, झारखंडच्या चंद्रप्रकाश सिंह यांनी एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र एमबीए केल्यानंतर नोकरी करण्याऐवजी त्यांनी शेतीची निवड केली. चंद्रप्रकाश यांनी चंदिगडमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि तेथूनच एमबीएची पदवी देखील मिळवली. एमबीए केल्यानंतर त्यांनी शेतीकडे आपला मोर्चा वळवला.

मित्रांनो नवल म्हणजे शेती करण्याआधी काही काळ चंद्रप्रकाश पुद्दुचेरीचे राज्यपाल आणि राज्यसभा सदस्य मुकुट मिंठी यांचे सचिवही राहिले आहेत. मात्र अगदी लहानपणापासून शेतीची आवड असलेले चंद्रप्रकाश यांना दिल्लीत नोकरी करताना काही मन रमेना आणि अखेर त्यांनी राज्यसभा सदस्य मुकुट यांची सचिव पदाची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवत पुन्हा झारखंड आपली जन्मभूमी गाठली आणि दुमका येथे राहून शेती करू लागले.

सरकारी योजनांचा लाभ घेतला अन शेती सुरू केली

चंद्रप्रकाश यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. आठ एकर जमिनीला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला आहे. विशेष म्हणजे ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी त्यांना 90 टक्के अनुदान सरकार कडून मिळाले आहे.

याशिवाय त्यांना उद्यान विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यांना 1000 मीटरचे ग्रीन पॉली हाऊससाठी अनुदान मिळाले आहे. फक्त शेतीच नाहीतर चंद्रप्रकाश यांचा शेती पूरक व्यवसाय करण्याचा देखील मानस आहे. शेती पूरक व्यवसायात चंद्रप्रकाश मत्स्यपालन करणार आहेत.

मत्स्य पालन करण्यासाठी लवकरच त्यांना बायोफ्लॉक मिळणार आहे. चंद्रप्रकाश यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे चंद्रप्रकाश रसायनमुक्त सेंद्रिय शेती करतात. भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था या नावाने संस्थेची नोंदणीही करत आहेत जेणेकरून त्यांना त्यांची उत्पादने विकताना कोणतीही अडचण येऊ नये आणि जवळपासच्या शेतकऱ्यांनाही त्रास होऊ नये. तसेच, त्यांनी FSSI मध्ये देखील नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांना एकात्मिक शेतीचे धडे देतात

मित्रांनो आम्हाला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे कि, चंद्रप्रकाश हे स्वतः सेंद्रिय पद्धतीने एकात्मिक शेती करीत आहेत याशिवाय चंद्रप्रकाश आपल्या शेजारील शेतकऱ्यांना आधुनिक आणि एकात्मिक शेतीबद्दल धडे देत आहेत.

सध्या 105 शेतकरी त्यांच्या संपर्कात आहेत. चंद्रप्रकाश यांना पाहून सर्व शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्याची प्रेरणा मिळत आहे. एवढेच नाही तर चंद्रप्रकाश लवकरच 300 शेतकर्‍यांसह फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्याचा विचार करत आहेत.

चंद्रप्रकाश बांसकुली लॅप्सचे सदस्य आहेत आणि ते बँकेचे प्रतिनिधी देखील आहेत. एकात्मिक आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी केवळ उत्पन्नच वाढवू शकत नाही तर त्यांच्या शेतातील मातीचा दर्जाही राखू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. निश्चितच चंद्रप्रकाश यांची शेती मधील हे कार्य इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे आणि आगामी काही काळात निश्चितच चंद्रप्रकाश प्रमाणे इतर शेतकरी देखील शेतीमध्ये बदल करीत चांगले नेत्रदीपक यश संपादन करते.

English Summary: Integrated Farming: MBA pass young farmers earning a fortune through integrated farming; Read the success story of this young farmer
Published on: 07 May 2022, 11:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)