मराठवाड्यात सध्या शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. पारंपारिक पिकातून कवडीमोल उत्पन्न प्राप्त होत असल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी कांदा या नगदी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही काहीसं असंच चित्र बघायला मिळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून एका शेतकऱ्याने याचा फायदा घेण्याचे ठरवले आणि आधुनिक पद्धतीने कांदा बियाण्याचे उत्पादन घेऊन बक्कळ नफा कमवला. या अवलिया शेतकऱ्याने कांदा लागवड करण्यापेक्षा कांद्याचे बियाणे उत्पादित करण्यातच लक्ष घातले आणि आता या शेतकऱ्याला याचा फायदा देखील मिळत आहे. या शेतकऱ्याने उत्पादित केलेले कांदा बियाणे आजूबाजूच्या परिसरातच विक्री होत असल्यामुळे त्याला बाजारपेठेत जाण्याची देखील गरज पडत नाही.
जिल्ह्यातील आडुळ येथील शेतकरी बबनराव आसाराम पिवळ यांनी कांदा बियाणे उत्पादित करून लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. बबनराव गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक शेती करत होते ते आपल्या शेतीत कापूस बाजरी तूर इत्यादी पारंपरिक पिकांची लागवड करीत असत. मात्र पारंपरिक पीकपद्धतीत केलेला खर्च देखील बबनरावांना काढन शक्य नव्हतं यामुळे त्यांनी शेतीमध्ये बदल करण्याचे ठरवले.
गेल्या तीन वर्षांपासून आडुळ व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड वाढत आहे. हीच बाब लक्षात घेता बबन यांनी कांदा बियाणे उत्पादित करण्याचे ठरवले, बबन यांना कांदा दराचा लहरीपणा चांगलाच ठाऊक होता त्यामुळे त्यांनी कांदा बियाणे उत्पादित करून विक्री करण्याकडे आपला कल ठेवला. तीन वर्षापूर्वी कांदा बियाणे उत्पादित करण्यास बबन यांनी सुरुवात केली मुहूर्ताच्या पहिल्या वर्षी एक एकर क्षेत्रात कांदा बियाणे उत्पादित केले.
पहिल्याच वर्षात बबन यांना एक लाख 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामुळे गदगद झालेल्या बबनने दुसऱ्या वर्षीदेखील कांदा बियाणे उत्पादित करण्याचे ठरवले आणि दुसऱ्या वर्षीही त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. सलग दोन वर्षे कांदा बियाणे उत्पादित करून त्यांना चांगला नफा राहिल्याने यंदा कांदा बियाणे अडीच एकर क्षेत्रात लागवड केले आहे. बबन यांना यंदा तब्बल चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याचा अनुमान आहे. बबन यांनी कांदा लागवड करण्यापेक्षा कांदा बियाणे उत्पादित करून चांगला नफा कमविला आहे. बबन यांना शेतीमध्ये त्यांचा मुलगा योगेश देखील मदत करत असतो.
संबंधित बातम्या:-
शेती म्हणजेच जीवन मरणाचा खेळ! कळंबमध्ये शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
मोठी बातमी! मोदी सरकार किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावासाठी लवकरच स्थापित करणार समिती
Published on: 01 April 2022, 10:34 IST