शेतकरी शेतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे उत्पन्न घेत असतो. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका, हरभरा या वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असतो. आणि त्यातूनच उत्पन्न मिळवत असतो.बरेच लोक म्हणतात की पिकाला काळी च जमीन पाहिजे. परंतु असे काही नाही खडकाळ असणाऱ्या जमिनीत सुद्धा योग्य मशागतीने चांगले उत्पन्न मिळवू शकतो.
35 गुंठे क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली:
बरेच लोक म्हणतात की खडकाळ जमिनीला पाणी(water) खूप लागते आणि पीक अजिबात चांगले येत नाही परंतु हे सत्य नाही. काही पिके अशी आहेत जी फक्त खडकाळ जमिनीतच चांगली येतात.खडकाळ जमिनीत काकडी, कलिंगड, ज्वारी इत्यादी पिके चांगली येतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे कलिंगड आणि आंतरपीक पद्धतीने फुल लागवड.आंबेगाव तालुक्यातील भराडी गावचे शेतकरी बाळासाहेब खिलारी यांनी 30 गुंठे क्षेत्रातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी 35 गुंठे क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली होती.आणि त्याच खडकाळ जमिनीत त्यांनी आंतरपीक म्हणून झेंडू ची फुलझाडे लावली होती. या अडीच महिन्याच्या काळात या शेतकऱ्याने पाच लाख रुपये निव्वळ फायदा मिळवला आहे.
खडकाळ जमिनीची मशागत:-
खडकाळ जमीनीची क्षमता ही कमी पाणी धरून ठेवण्याची असते. जास्त पाऊस पडल्यावर या जमिनीत पाणी राहत नाही त्यामुळं पावसाळ्यात सुद्धा या जमिनीत चांगले पीक येते.खडकाळ जमिनीत आले, बटाटा ,कलिंगड असलेली कंद प्रकारच्या पालेभाज्या या चांगल्या प्रकारे येतात. या जमिनीला सुरवातीला नांगरून शेणखत घालावे. खडकाळ जमिनीत रासायनिक खतांचा हा प्रभाव कमी असतो. त्यामुळं खडकाळ जमिनीत सर्वात उपयुक्त हे शेणखत च असते. खत घालून झाल्यावर सरी सोडून त्यावर कलिंगडाचे रोप किंवा बियाणांची लागवड करावी.
तसेच सर्वात म्हणजे पाण्याचे योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. बाळासाहेब खिलारे यांनी 35 गुंठे खडकाळ क्षेत्रातून कलिंगड लागवड आणि आंतरपीक फुल शेती करून बक्कळ नफा मिळवला आहे.सध्या बाजारात झेंडू ला 80 ते 100 रुपये प्रातिकिलो एवढा भाव आहे. खडकाळ जमिनीत पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्दत ही योग्य आहे. बाळासाहेबानी 50 हजार रुपये खर्च केला परंतु त्यातून त्यांनी फक्त 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळवला आहे.
Published on: 20 October 2021, 08:36 IST