Success Stories

दर शेती क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विचार केला तर इस्राईल आणि चीन या देशांचा अग्रक्रम लागतो.कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इस्राईल जलद गतीने प्रगती करीत आहे.

Updated on 13 February, 2022 11:18 AM IST

दर शेती क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विचार केला तर इस्राईल आणि चीन या देशांचा अग्रक्रम लागतो.कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इस्राईल जलद गतीने प्रगती करीत आहे.

इजरायल मधील नवनवीन शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि त्यामुळे होणारा फायदा या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने काही शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी इस्राईल  पाठवले होते. येथे गेलेल्या काही शेतकऱ्यांमध्ये देवघर जिल्ह्यातील पदनबोरा गावातील वकील यादव यांचा देखील समावेश होता. यादव यांना सुरुवातीपासूनच शेती आणि अन्य शेती संबंधित कामांमध्ये फारच आवड आहे.त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर इस्राईल ॲपे शिकलेल्या नवनवीन तंत्रज्ञान व त्याचा वापर करून स्ट्रॉबेरीची शेती करायला सुरुवात केली. यासोबतच त्यांनी सेल्फ हेल्प ग्रुप  नावाच्या महिलांच्या एका ग्रुपला स्ट्रॉबेरी संबंधी प्रशिक्षण दिले.

यामागे यादव यांचा उद्देश होता की त्यांनी जे प्रशिक्षण घेतले त्याचा लाभ अन्यलोकांना देखील मिळावा. त्यामुळे त्यांनी या ग्रुपच्या माध्यमातून सर्व महिलांना एकत्र करून देवघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ दहा एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली.या बाबतीत या महिलांनीसांगितले की स्ट्रॉबेरीची शेती ते पहिल्यांदाच करीत असून या शेतीच्या माध्यमातून किती फायदा होईल याचा अंदाज नाही. या बाबतीत या महिलांचे म्हणणे आहे की, जर या स्ट्रॉबेरी लागवडीतून चांगला नफा झाला तर येणाऱ्या दिवसांमध्ये स्ट्रॉबेरीच्या लागवड क्षेत्रात वाढ केली जाईल. त्यांनी पुढे सांगितले की  यामध्ये त्यांना कृषी विभागाचे अधिकारी आणि जेएसएलपीएस यांच्याकडून स्ट्रॉबेरीचे रोपांपासून तर शेती करण्यासाठी लागणारे बऱ्याच गोष्टींची मदत मिळत आहे. 

आपल्याला माहित आहेच कि सध्या बाजारपेठेमध्ये स्ट्रॉबेरी ची मागणी अगोदर पेक्षा जास्त वाढत आहे. कारण स्ट्रॉबेरीचे आरोग्यदायी महत्त्व लोकांना आता माहीत झाले आहे.  त्यामुळे बाजारपेठांमध्ये स्ट्रॉबेरी चे बाजार भाव चांगल्या प्रकारे टिकून राहतात. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा नफा मिळतो. जर स्ट्रॉबेरीचा विचार केला तर एक नाजूक फळ असून खायला ते आंबट-गोड असते व त्याचा रंग लाल असतो. हे एकमेव असे फळ आहे की या फळाची बी हे बाहेरच्या बाजूने असते.

English Summary: in zharkhnad state lady farmer start strawberry farming in 10 acre help by isriel technique
Published on: 13 February 2022, 11:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)