शेतकरी म्हटले की त्याच्या आयुष्यात चढउतार येतातच. कधी चांगले दिवस येतात, तर कधी त्याच्यावर आत्महत्या करण्याची देखील वेळ येते. मात्र अनेक शेतकरी कमी शेतीमध्ये चांगले उत्पन्न मिळवतात. या शेतकऱ्याने आपली जिद्द टिकवत अवघ्या २० गुंठ्यात कांद्याचे उत्पादन करून १ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यामुळे या शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. मध्यंतरीच्या काळात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. अनेकांचे शेतीमधील उभे पीक पाण्याखाली गेले.
असे असताना मात्र यापुढे हार न मानता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामधील औसा तालुक्यातील बेलकुंड गावाचे रहिवासी शेतकरी शरद नवनाथ हलकरे यांनी अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी निसर्गाशी दोन हात करत संकटांना परतावून लावले आहे. त्यांनी कांद्याचे सुधारित बियाणे, योग्य खत, आणि पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींची सांगड घालत कांद्याचे यशस्वी पीक आणले. त्यांनी सर्व काही कृषी तज्ज्ञांच्या नियोजनानुसार केले. त्यामुळे, त्यांना केवळ २० गुंठ क्षेत्रात ८५ हजार रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला. त्यांना २० गुंठे कांदा लागवडीसाठी सुमारे पंधरा हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे. कमी काळात त्यांनी जास्त पैसे कमवले आहेत.
त्यांनी लागवडी पूर्व आणि नंतर वेळोवेळी या संदर्भात कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. पाण्याचे नियोजन, कांद्याची लागवड, वेळोवेळी खत वापरून कांद्याचे पीक व्यवस्थित पोसले. त्यांनी २० गुंठे क्षेत्रात पाच क्विंटल कांदा उत्पादित केला, त्यांनी आपला कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेला होता. त्यांना तिथे २३०० रुपये प्रति क्विंटल दराने बाजारभाव मिळाला. यामुळे त्यांचे चांगले पैसे झाले. त्यांना बियाणांसाठी दोन हजार रुपये खर्च आला, कांदा लागवडीसाठी आणि काढण्यासाठी दहा हजार रुपये खर्च आला तसेच फवारणीसाठी त्यांना तीन हजार रुपये खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सर्वच गोष्टींचे चांगले नियोजन केल्याने हा मेळ त्यांना साधता आला आहे. ते एक आदेश शेतकरी म्हणून ओळखले जातात.
त्यांचा हा उत्पादन खर्च वजा करून त्यांना तब्बल ८५ हजार रुपये प्राप्त झाले. या नियोजनामुळे आज ते इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत. शेतात ते नेहेमी वेगवेगळे प्रयोग करण्याचा विचार करत असतात. आणि यामध्ये ते यशस्वी देखील होतात. येणाऱ्या काळात देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना सक्षम करणार असल्याची त्यांनी म्हटले आहे. इतर शेतकऱ्यांना ते नेहेमी मार्गदर्शन करत असतात.
Published on: 18 January 2022, 10:20 IST