शेतकरी सध्या शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची लागवड करताना दिसत आहेत. तसेच नाविन्यपूर्ण प्रयोग बरेचशेतकरी करतात. तंत्रज्ञानाची जोड आणि योग्य व्यवस्थापनामुळे बरेच शेतकरी यामध्ये यशस्वी होतात.असेच एका यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा या लेखामध्ये आपण पाहणार आहोत
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खैरी या गावचे शेतकरी दादाजी फुंडेत्यांनी त्यांच्या शेतामध्ये विविध प्रयोग करून त्या प्रयोगांना तंत्रज्ञानाची जोड देऊन आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. गोंदिया जिल्हा मध्ये जास्त करून धानाची शेती केली जाते.फुंडे यांनी त्यांच्या या परंपरागत शेतीला बगल देत त्यांना आवडते पिकांचे उत्पादन घेऊन बऱ्याच मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
दादाजी फुंडे यांनी 1980सालापासून शेती व्यवसाय करायला सुरुवात केली..शेती करत असताना ती एका वेगळ्या पद्धतीने करण्याचा निश्चय त्यांनी केला.त्यासाठी त्यांनी तेरा एकर शेती विकत घेतली.शेती करण्याअगोदर आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या.ज्या शेतामध्ये साधे गवत देखील उगवत नव्हते. त्या शेतामध्ये चार बोर आणि विहीर खोदून शेती ओलीताखाली आणली. सिंचनाची व्यवस्था केल्यानंतर त्यांनी आंबा आणि सागाची झाडे लावली तसेच सोबत देशी गाईंचे पालन करत रब्बी पिके हरभरा,, तुर, सूर्यफूल आणि मक्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
अशा पद्धतीने केले शेतात अनोखे प्रयोग
त्यांनी जमिनीचे उतार पाहून 23 प्लॉट तयारकेले. त्यासाठी चार एकर जागेत त्यांनी शेडनेट तयार करून त्यामध्ये पारंपारिक आंतरपिके घेत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले तर पांढऱ्या चंदनाची शेती केली.
त्यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे यांच्या शेतात जवळजवळ 100 पेक्षा अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. चाकण गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर हा धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.मात्र या पारंपरिक शेतीला फाटा देऊन दादा फुंडेयांनी बारमाही शंभरावर सेंद्रिय पिकांची उत्पादन आपल्या शेतात घेत लाख रुपये मिळवतात. त्यांच्या या नवीन प्रयोगाचे अनुकरण शेतकऱ्यांनी देखील करावे अशी प्रेरणा ही तर शेतकऱ्यांना देत आहेत. यांच्या प्रेरणेमुळे धानाच्या पट्ट्यात आता शेतकरी बागायती शेतीकडे वळू लागले आहेत.(स्त्रोत-tv9 मराठी)
Published on: 29 January 2022, 10:14 IST