Success Stories

कांद्याचे आगार म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल आणि रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये पिकणाऱ्या लाल कांद्याचा लागवडीचा प्रयोग अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच शेतात केला आणि हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवला.

Updated on 09 January, 2022 9:23 AM IST

कांद्याचे आगार म्हणून  नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल आणि रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये पिकणाऱ्या लाल कांद्याचा लागवडीचा प्रयोग अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच शेतात केला आणि हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवला.

 एका एकर मध्ये या शेतकऱ्याने चक्क नव्वद क्विंटल  लाल कांद्याचे उत्पादन घेऊन  आश्चर्याचा धक्का दिला आहे.

 अमरावती जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन घेणारे पहिले शेतकरी

 अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील राजेश मळसने शेतकरी मागील काही वर्षापासून सफेदकांद्याची लागवड करतात.परंतु अनेकदा अवकाळी पावसामुळे या कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. यावर्षी त्यांनी लाल कांद्याची लागवड करण्याचे ठरवले एक एकर क्षेत्रावर त्यांनी खरीप हंगामात कांद्याची लागवड केली.

त्याचे नियोजन करताना त्यांनी शेतामध्ये शेण खताचा वापर केला तसेच गोमूत्र,गुणवत्तापूर्ण बियाणी तसेच वेळेवर अन्नद्रव्यांचे आणि कीटकांची योग्य व्यवस्थापन केले.योग्य व्यवस्थापनाच्या आधारे त्यांनी एका एकर मध्ये तब्बल 90 क्विंटल  लाल कांद्याची विक्रमी उत्पादन घेतले. याविषयी बोलताना राजेश मळसने म्हणतात की अमरावती जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन घेणारे ते पहिले शेतकरी आहेत.

मलसने यांना कांदा पिकासाठी जवळपास एकरी 53  हजार रुपये खर्च आला असून कांदा उत्पादनाच्या माध्यमातून त्यांना एक लाख 53 हजार रुपयांचे उत्पादन झाले असून 17 रुपये किलो प्रमाणे त्यांनी हा कांदा शेतातून विकला आहे. यामधून खर्च वजा करून त्यांना निव्वळ नफा एक लाख रुपये मिळाला. येथे कृषी सहाय्यक मारुती जाधव यांनी वेळोवेळी राजेश यांच्या शेताचा पाहणी दौरा केला तसेच त्यांना विविध औषधांसाठी मार्गदर्शन व मदत केली.(संदर्भ-हॅलोकृषी)

English Summary: in ajangaon surji taluka farme cultivate first time red onion and take 90 quintql production per acre
Published on: 09 January 2022, 09:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)