Success Stories

आपण जो विचारही करू शकत नाही असे काही परभणी जिल्ह्यातल्या लोहगाव येथील 21 वर्षीय रेणुकाने करून दाखवले आहे. शेण आणि पालापाचोळ्यातून वर्षाला लाखो रुपये कमवले जाऊ शकतात,' असं दाखवून दिले आहे. यावर आपला विश्वास बसणार नाही पण हे खरे असून अगदी शेण आणि पालापाचोळ्यातून परभणी जिल्ह्यातल्या लोहगाव येथील 21 वर्षीय रेणुकाने अक्षरशः लाखो रुपये कमावले आहेत.

Updated on 27 April, 2022 3:44 PM IST

आपण जो विचारही करू शकत नाही असे काही परभणी जिल्ह्यातल्या लोहगाव येथील 21 वर्षीय रेणुकाने करून दाखवले आहे. शेण आणि पालापाचोळ्यातून वर्षाला लाखो रुपये कमवले जाऊ शकतात,' असं दाखवून दिले आहे. यावर आपला विश्वास बसणार नाही पण हे खरे असून अगदी शेण आणि पालापाचोळ्यातून परभणी जिल्ह्यातल्या लोहगाव येथील 21 वर्षीय रेणुकाने अक्षरशः लाखो रुपये कमावले आहेत.

 ती यामागील सिक्रेट सांगण्यासाठी नेहमी तयार असते, कारण तिचे म्हणणे आहे की जितके जास्त लोक तिचं सिक्रेट वापरतील तितका जास्त तिचाच फायदा आहे. यागील सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊया.  परभणी जिल्ह्यातील 12 वी सायन्स झालेली रेणुका सीताराम देशमुख ही एक लघुउद्योजिका आहे. सेंद्रीय शेती करते व सेंद्रीय खत तयार करते.

 

ती हा प्रकल्प वाढवण्यासाठी प्रयतन करत असून त्यासाठी ती विविध कार्यशाळांचं आयोजन करते. दहा वर्षांपूर्वी वडिलांना केवळ मदत म्हणून सुरू केलेली गोष्ट पुढे जाऊन व्यवसायात रूपांतर झाली.  कोरोना काळात रेणू ८ लाख रुपयाची उलाढाल केल्याचे रेणू सांगते यामधील ५० टक्के नफा मिळाल्याचेही ती सांगते.

२०११ मध्ये रेनुकाचे वडील सीताराम देशमुख कृषी यांनी परभणी विद्यापीठाकडून आजूबाजूला गांडूळ बीज घेतले होते,  आणि गांडूळ खत कसं तयार करायचं याचं प्रशिक्षण विद्यापीठाकडून घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतातच असलेल्या उंबराच्या झाडाखाला गांडूळ खतासाठी एक हौद तयार केला. त्यावेळी रेनुकाचे वय अवघे ११ होते, रेणुका शेतकरी कुटुंबातीलच असल्याने घरात शेतीच वातावरण होते. ती वडिलांना शेतीत मदत करत असे, त्यावेळी तिला गांडूळ खताची माहिती मिळाली, त्यांनी तयार झालेल्या खताचा वापर त्यांनी आपल्या शेतात केला आणि त्यांच्या जमिनीची पोत सुधारत गेल्याचे ते सांगतात.

 रेनुकाच्या या कल्पनेला इथूनच सुरवात झाली, लोक त्यांना याबाबत विचारू लागले व ८ रुपये किलोने हे खत विकले जाऊ लागले. यामध्ये राजकीय लोकही हे खत खरेदी करू लागले आणि रेणुकाने या व्यवसायात उतरण्याचे ठरवले.  त्यानंतर छोट्या मोठ्या १०ते २५ किलोच्या ऑर्डर रेनुकाला मिळायला लागल्या आणि हा व्यवसाय चालू झाला ज्यांना खत निर्मिती करण्यासाठी गांडूळ बीज पाहिजे आहे त्यांना गांडूळ बीज विक्री केल्याचे ती सांगते, त्यामुळे त्यांना नफा मिळू लागला आणि हा व्यवसाय वाढत वाढायला लागला. रेणुका आता पूर्ण वेळ व्यवसाय करत असली तरी तिला विद्यापीठातून पदवी घ्यायची आहे. व्यवसायाचा फायदा शिक्षणात आणि शिक्षणाचा फायदा व्यवसायात होईल असे ती सांगते.

महत्वाच्या बातम्या
कृषी क्षेत्रातील तरुण उद्योजकांसाठी बातमी! कोल्ड स्टोरेज साठी सरकारकडून मिळतेय अनुदान, वाचा आणि घ्या माहिती
प्लास्टिक आच्छादनाचा वापर ठरेल भुईमूग पिकासाठी वरदान, पीक होईल 8 ते 10 दिवस काढणीस लवकर तयार

English Summary: How the girl earned millions of rupees from dung and mulch
Published on: 27 April 2022, 03:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)