solapur : सध्या अवकाळी पावसाने तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यातच जाते असा बरेचजण विचार करतात. मात्र या सगळ्यांवर मात करत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याने सगळ्यांना अचंबित करणारे काम केले आहे. बार्शी तालुक्यातील सुर्डी येथे राहणारे भाऊ डोईफोडे यांनी बेदाणा निर्मितीमधून जवळजवळ 12 लाखांचे उत्पादन घेतले आहे.
एका एकरामध्ये तब्बल बारा लाखांच उत्पादन घेत भाऊ डोईफोडे हे सर्वांसाठी प्रेरणा देणारे ठरले आहेत. शेती क्षेत्रात केलेल्या या आदर्शवत कामाचं त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे. डोईफोडे यांनी एका एकरामध्ये जवळपास सहा क्विंटल सहाशे किलोग्राम बेदाणा निर्मिती केली. सुर्डी गावाने मागील महिन्यात जल व्यवस्थापनात कौतुकास्पद कार्य केले होते. त्यामुळे या गावाला दिल्लीत जल व्यवस्थापनाचा पुरस्कार देण्यात आला होता.
डोईफोडे यांनी शेती व शेतकर्यांसमोर सातत्याने येत असलेल्या आव्हानांना तोंड देत सन 2016 -17 मध्ये आपल्या काळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये नऊ बाय पाच अंतरावर क्लोन जातीच्या बेदाणा निर्मितीसाठी वाणाची निवड केली. तसेच रोपांची लागवड केल्यानंतर रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर केला. भेसळ डोस, शेणखत, मळी या खतांचा वापर करून पाचट टाकून नैसर्गिक मल्चिंगदेखील केले. गरजेनुसार डाऊनी, भुरी करपा इ. फवारणी घेण्यात आली.
त्यानंतर त्यांनी मार्च 2017 मध्ये क्लोन जातीच्या द्राक्षांच पहिलं पीक घेतलं होत. द्राक्षबागेची निगा राखत वार्षिक उत्पादनांमध्ये प्रगती केली. आणि मार्च 2022 मध्ये तर चक्क एक एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ 6 क्विंटल 600 किलोग्राम इतके मनुक्याचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले.गावामध्येच विविध योजनांमधून बेदाणा निर्मितीसाठी शेडची सोया झाली.मिळालेल्या शेडमध्ये सोय झाल्यामूळे बेदाणा निर्मिती सोपी पडते.
तसेच बेदाणा निर्मितीनंतर गावांमध्येच असलेल्या प्रक्रिया केंद्रामधून बेदाण्याची प्रतवारी करणे सहज शक्य झाले. बेदाण्याची प्रतवारी झाल्यानंतर तो बेदाणा व्यापारी दृष्टिकोनातून बाजारपेठेमध्ये पाठवला जातो. असे डोईफोडे यांनी सांगितले. शेतकरी भाऊ डोईफोडे हे पूर्वी तूर, मका यासारखी पारंपरिक पिके घेत होते. मात्र बेदाणा निर्मितीच्या उद्देशाने त्यांनी शेतात द्राक्षबागेची लागवड केली.
Ginger farming : शेतकऱ्याचे संकट काही संपेना; या कारणामुळे आले लागवड हुकली
सुर्डीतील बेदाण्यास सांगली,तासगाव इत्यादी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. बारा लाख रुपयांच्या उत्पादनामधील तीन लाख रुपये द्राक्षबागेची वार्षिक देखभाल करण्यासाठी जातात. त्यामध्ये खतांची मात्रा, फवारणी, विविध खते व इतर बाबींसाठी हा खर्च होतो. भाऊ डोईफोडे यांच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा मोठा हातभार होता. या सर्वांनी त्यांना बेदाणा निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तसेच मार्गदर्शन केले. जेमतेम नववीपर्यंतचे शिक्षण घेतलेला तरुण शेतकरी भाऊ डोईफोडे यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे.
महत्वाच्या बातम्या:
आई, वडील मजूर तर तो विकायचा भाजी; असा झाला दिवाणी न्यायाधीश
शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे का? असा करा अर्ज; मिळेल हक्काचा रस्ता
Published on: 05 May 2022, 05:21 IST