मुंबई : देशात अनेक गोष्टींच्या किंमती वाढत आहे. त्याचबरोबर आता दैनंदिन वापरात असलेल्या वस्तूंच्या किंमती देखील आकाशाला भिडत आहेत.
त्यात आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. जसे अलीकडेच लिंबाच्या किमती वाढल्यानंतर आता टोमॅटोच्याही किमती वाढताना दिसत आहेत. टोमॅटोच्या पिकावर टूटा एब्सलुटा या प्रकारच्या किडीने हल्ला केला असल्याने यंदाही टोमॅटो महाग होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
टोमॅटो ही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाणारी भाजी आहे.
याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. मात्र, साठवण्याच्या सुविधेचा अभाव असल्यानं याच्या दरांमध्ये सर्वात जास्त चढ-उतार पाहायला मिळतात. अगदी एका-एका महिन्याच्या अंतरानेही टोमॅटो कधी 4 ते 5 रुपये किलो दराने कमी जास्त होऊ शकतात. नंतर लगेच काही दिवसांनी अचानकपणे शंभर रुपये किंवा त्याहीपेक्षा अधिक किलोचा भाव वाढू शकतो. अशा पद्धतीनं काही वेळा शेतकऱ्यांना नुकसान होतं तर काही वेळेस ग्राहकांना. ऋतुबदलाचा या भाजीवर काही ना काही प्रभाव पडत असल्यानेच वर्षभरात टोमॅटोचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत नाही.
देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये टोमॅटोच्या किमती वेगवेगळ्या आहेत. सध्या या किमती 25 रुपये किलोपासून ते 40 रुपये किलोपर्यंत आहेत. टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यास या किमती आणखी वाढतील. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात टोमॅटो मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. मात्र, ही भाजी नाशिवंत आहे. ती फार काळ टिकत नसल्याने साठवून ठेवणं शक्य नाही. त्यामुळे ते कोणीही एका वेळेस जास्त प्रमाणात खरेदी करत नाही. यामुळं देखील टोमॅटोचा पुरवठा कमी झाला की दर लगेच वाढतात.
तसेच इंधन दरात वाढ झाल्यामुळेही या वर्षी भाज्या महाग झाल्या आहेत. भाज्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्याच्या दरात वाढ झाल्यामुळे हा परिणाम दिसत आहे. सध्या मुंबईत टोमॅटो 40 रुपये किलो दराने विकला जातोय. तर, लिंबू तब्बल 250 ते 300 रुपये किलोवर पोहोचलं आहे.
त्यामुळे आता लिंबा पाठोपाठ टोमॅटोला भावाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच आनंद झाला असेल. झालं अशाप्रकारे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना निंबु आणि टोमॅटो ला भाव मिळत आहे ही आनंदाची बाब आहे.
Published on: 14 April 2022, 05:05 IST