जगातील सर्वात मोठी चेन सॉ उत्पादक कंपनी स्टील इंडिया यांच्या व्यवस्थापकीय संचालक श्री. परिंद प्रभुदेसाई यांच्याशी केलेली खास मुलाखत.
प्रश्न: चेन सॉ निर्मितीत स्टिल जगातील अग्रगण्य नाव आहे. भारतासाठी विशेष म्हणून आपण आणखीन कोणती उत्पादने आणली आहेत?
उत्तर: चेन सॉ निर्मिती हे नक्कीच आमचे बलस्थान आहे. परंतु या शिवाय बाजारपेठेत आमच्या ब्रश कटर्स, मिस्ट ब्लोवर्स, क्लीनर्स, हेज ट्रीमर्स आणि इतर अनेक हँडहेल्ड पावर टूल्स अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. ही विस्तृत उत्पादन श्रेणी असल्याने वनीकरण, शेती, बागकाम (हॉर्टीकल्चर आणि गार्डनिंग), नागरी देखभाल, लँडस्केपिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये आम्ही सेवा देत आहोत.
प्रश्न: स्टिलकडे असलेल्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमधून 2019 या वर्षात, बाजारपेठेच्या दृष्टीने कुठल्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल
उत्तर: चेन सॉ श्रेणी ही आमचे प्रमुख बलस्थान असल्याने वनीकरण आमच्या प्रोडक्ट मिक्सचा एक महत्वाचा भाग यापुढे देखील राहील. लँडस्केपिंग आणि बागकाम क्षेत्रात देखील आमचे भारतात अनेक ग्राहक आहेत. 2018 मध्ये खास शेती क्षेत्रात प्रथम स्तरीय यांत्रिकीकरण आणण्यासाठी आम्ही ‘फार्मर रेंज ऑफ प्रोडक्ट्स’ बाजारात आणली. आता या सामान्य भारतीयाला परवडणाऱ्या फार्मर रेंज उत्पादने आणि ‘जर्मन गुणवत्ता व इनोवेशन’सह स्टिल इंडिया सामान्य शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन आणत आहे. लघु व मध्यम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच, त्यांच्या रोजच्या शेतीच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही ही उत्पादने बाजारात आणली आहेत. या नव्या फार्मर रेंजमध्ये ब्रश कटर, पाॅवर वीडर, वॉटर पंप आणि अर्थ आगर या उत्पादनांचा समावेश आहे. ‘कृषी उपकरण लाए परिवर्तन’ या आमच्या विश्वासासह आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याचे उद्दिष्ठ ठेवतो. या श्रेणीत लवकरच आम्ही नवीन उत्पादनांची भर घालणार आहोत.
प्रश्न: पावर टिलर्सने ग्रामीण भारतात इतकी मजबूत जागा मिळवलेली असताना पावर वीडर BC 230 सारख्या उत्पादनांना तिथे कितपत वाव आहे असे तुम्हाला वाटते?
उत्तर: पावर टिलर्स उच्च एच.पी. असलेले आणि त्यामुळेच प्राथमिक लागवडीसाठी उपयुक्त उपकरणे आहेत. परंतु ग्राहकांमध्ये वीडिंग आणि मध्यम लागवडीसाठी उपयुक्त अशा विश्वासू आणि व्यावसायिक स्वरूपाच्या उपकरणाची मागणी होती. ही मागणी BC 230 ग्राहकांच्या पसंतीस उतरत असलेल्या उत्पादनाने भरून काढली आहे. आम्ही यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असून, लोकप्रियता आणि समाधानाच्या कसोटीवर हे उपकरण नेहमीच सिद्ध होत राहील याची आम्हाला खात्री आहे. BC 230 हे 2.1 एच.पी. चे उपकरण असून शेतीसाठी जमीन तयार करणे, माती उलटणे, एरेटिंग, इंटर-कल्टीव्हेशन आणि मल्चिंगसाठी उपयुक्त आहे. मातीची ढेकळे फोडून लागवडीसाठी योग्य जमीन (बारीक माती) तयार करण्याचे काम ते करते.
प्रश्न: स्टिल आपल्या प्रीमियम (उच्च) गुणवत्ता श्रेणी उत्पादनांसाठी ओळखले जाते. हीच गुणवत्ता सातत्याने ग्राहकापर्यंत पोचेल याची आपण कशी काळजी घेता?
उत्तर: स्टिल आपल्या सर्विसिंग डीलर्समुळे ओळखले जाते, जे आम्हाला भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोचण्यास आणि त्यांना सेल्स आणि सर्विस निगडीत सेवा देण्यास मदत करतात. एडव्हाईस-इन्सट्रक्ट-सर्व्हिस ही स्टिलची त्रिसूत्री आहे. ग्राहकांच्या अडचणी दूर करून मागण्या पूर्ण करण्यासाठी सल्ला देणे आणि उपकरण वापरण्याची योग्य पद्धत सांगणे याकडे आम्ही सातत्याने लक्ष देतो. गॅसोलिन उपकरणांवर आम्ही 1 वर्षाची वॉरंटी देतो ज्यामुळे आमच्या ग्राहकांशी आमचे विश्वासाचे संबंध तयार झाले आहेत. स्टिलने नुकतेच आपले चौथे प्रादेशिक टेक्निकल केंद्र, वेअरहाउस आणि ऑफिस सुरु केले आहे ज्यामुळे सेवा पुरवठा व्यवस्थेत विकेंद्रीकरण होऊन, आम्हाला अधिक जलद आणि उच्च प्रतीचा आफ्टर सेल्स (विक्री पश्चात) सेवा देता येतील.
प्रश्न: भारतात 12 वर्षाची कारकीर्द पूर्ण केल्यावर आता स्टिलच्या भविष्यासाठी काय योजना आहेत?
उत्तर: स्टिल समूहासाठी भारत सातत्याने महत्व राखून आहे. भारत ही एक समृद्ध, उत्साहपूर्ण आणि विविधतेने नटलेली अर्थव्यवस्था आहे, जिचे प्रतिबिंब तिच्या संस्कृती, बाजारपेठ, माणसे व आव्हानांमध्येही दिसून येते. स्टिलच्या उत्पादनांची सातत्याने वाढणारी मागणी लक्षात घेता आम्ही चाकण, पुणे येथे नवीन सुविधेस अधिक प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. स्टिलचे जर्मन व्यक्तित्व असलेले हे एक अत्याधुनिक टेक्निकल केंद्र असण्याबरोबरच, इथे आमचे अनेक यशस्वी प्रयोग पाहण्यास मिळतील.
मिडिया रिलेशन टीम, स्टील इंडिया
info@stihlindia.com
Published on: 03 March 2019, 12:38 IST