आताच्या तरुणांचा विचार केला तर जे रुजलेले क्षेत्र आहे शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये अमुक एक शिक्षण घेऊन स्थैर्य युक्त जीवन जगता येते. अशाच क्षेत्रांना पसंती देताना तरूण दिसतात. परंतु समाजामध्ये असेही काही अवलिया आहेत, कि ते नेमके सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करून यशाला गवसणी घालतात. त्यामुळे या लेखात अशाच एका यशस्वी तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत.सांगलीच्या 34 वर्षीय शितल सूर्यवंशीने सांगली सारखा ऊस पट्ट्यात पेरूची शेती करत चांगले उत्पन्न घेऊन दाखविले आहे. या पठ्ठ्याने कार्पोरेट क्षेत्रातली चांगली नोकरी सोडून पेरू शेती करण्याची हिंमत केली आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करून दाखवला.
शितल सूर्यवंशी चे शिक्षण 2009 दहामध्ये पूर्ण केल्यानंतर जवळजवळ पाच वर्ष एका खासगी कंपनीत काम केले. परंतु उसाऐवजी दुसरो पीक घेऊन शेतीत यशस्वी होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत. जर ऊस पिकाचा विचार केला त्याला लागणारा जास्तीचं पाणी आणि उत्पन्न देण्याचा कालावधी याचा विचार केला तर हा कालावधी फार मोठा असतो. म्हणून त्याला पर्याय म्हणून शीतलने पेरूची लागवड करण्याचा विचार केला. 2015 मध्ये चांगली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्या क्षेत्रात त्यांनी विविध प्रजातीच्या पेरूची लागवड केली. रसायनिक खतांचा वापर करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला. या नाविन्यपूर्ण प्रयोगाला पहिल्याच वर्षी चांगले यश मिळाले. पहिल्याच वर्षी त्यांना दहा टन पेरूचं उत्पन्न झाले. या उत्पन्नातून त्यांना पहिल्याच वर्षी तीन लाख रुपये मिळाले. या सर्व खर्च वजा जाता एकूण 14 महिन्यात एक ते तीन लाखांचा नफा मिळवला.
पेरूची लागवड केल्यापासून शितलला चांगला आर्थिक फायदा व्हायला लागला. झालेले उत्पन्न बाजारातील याव्यतिरिक्त ओळखीने माल विकायला लागल्याने त्यातून त्यांना दिवसाला 10 हजार रुपये उत्पन्न मिळायला लागले. शेतकऱ्यांचा हा यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी ही पेरू लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एकर जमिनीवर पेरूची लागवड करण्यासाठी किमान 2 हजार झाडे लागतात. हे सगळ्या झाडांना सेंद्रिय खतांचा वापर केल्यास चांगल्या प्रकारच्या आर्थिक उत्पन्न मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असे मत शितल सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
Published on: 25 December 2020, 07:27 IST