Success Stories

एकीकडे देशातील नवयुवक शेतकरी पुत्र शेतीकडे पाठ फिरवीत आहेत तर दुसरीकडे उच्चशिक्षित आणि लाखो रुपयांची नोकरी असलेले सुशिक्षित नवयुवक आता शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे हे नवयुवक उच्चशिक्षित शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा देखील वापर करू लागले आहेत. यामुळे त्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होत असून याचा देशातील शेतकऱ्यांना देखील आगामी काही काळात फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 30 April, 2022 10:29 PM IST

एकीकडे देशातील नवयुवक शेतकरी पुत्र शेतीकडे पाठ फिरवीत आहेत तर दुसरीकडे उच्चशिक्षित आणि लाखो रुपयांची नोकरी असलेले सुशिक्षित नवयुवक आता शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे हे नवयुवक उच्चशिक्षित शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा देखील वापर करू लागले आहेत. यामुळे त्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होत असून याचा देशातील शेतकऱ्यांना देखील आगामी काही काळात फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

राजस्थान मध्ये देखील दोन उच्चशिक्षित तरुणांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती क्षेत्राकडे आपली वाटचाल सुरू केली आहे विशेष म्हणजे यात ते यशस्वी देखील झाले आहेत आणि कोटींच्या घरात आता उलाढाल करत आहेत. लाखोंचे पॅकेज आणि बहुराष्ट्रीय कंपनीतील आलिशान जीवनशैली सोडून दोन आयआयटी पास आऊट इंजीनियर्सने घराच्या गच्चीवर भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली.

मात्र 4 वर्षात या दोघांनी 4 कोटींची उलाढाल असलेली कंपनी तयार केली. श्री गंगानगर येथील अमित कुमार आणि रावतभाटा येथील अभय सिंग यांनी आयआयटी, मुंबईमध्ये शिक्षण घेतले.  दोघेही रोबोटिक्सवर संशोधन करत होते. यादरम्यान दोघांची मैत्री झाली. अमित आणि अभयने 2015 मध्ये नोकरीला सुरुवात केली. त्यावेळी दोघांचे वार्षिक पॅकेज 15-15 लाखांच्या आसपास होते. 2017 पर्यंत दोघांनी पुणे, मुंबई बंगलोर येथे वेगवेगळ्या कंपनीत काम केले. तोपर्यंत त्यांचे पॅकेज 20 लाखांवर गेले होते.

नोकरी निमित्ताने वेगवेगळ्या राज्यात फिरत असताना या दोघांना ग्रोइंग चेंबर्स आणि पॉलीहाऊस शेतीची कल्पना सुचली. दोघांनी ठरवलं की आपण शेतीत काहीतरी नवीन आणि हटके करायचं. 2018 मध्ये त्यांनी याची सुरुवात केली आणि 4 वर्षात शेतीला कॉर्पोरेट व्यवसाय बनवला. आज 75 लोकांची टीम त्याच्यासोबत काम करत आहे, ज्यात कामगार, मार्केटिंग टीम आणि मॅनेजर यांचा समावेश आहे.

तीन शहरांमध्ये 5 पॉलीहाऊसची केली उभारणी - कंपनीचे संस्थापक अमित सांगतात की, आमच्या कंपनीचे एकी फूड्सचे ध्येय लोकांना शुद्ध सेंद्रिय भाज्या उपलब्ध करून देणे आहे. त्यांची कोटा, बुंदी आणि भिलवाडा येथे 5 पॉलीहाऊस आहेत. पॉलीहाऊसचे मासिक उत्पन्न सुमारे 10 लाख आहे. अशा स्थितीत एका पॉलीहाऊसमधून वर्षाला 1 कोटींहून अधिक तर सर्व पॉलीहाऊसच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार केला तर 4 कोटींहून अधिक उलाढाल होते. पॉलीहाऊसमध्ये तयार होणारा भाजीपाला देशातील अनेक बहुराष्ट्रीय फूड ब्रँड आणि फास्ट फूड कंपन्यांना विकला जात आहे.

एक कल्पना सुचली अन करोडोंची उलाढाल झाली - अमित आणि अभय सिंह यांनी सांगितले की, सेंद्रिय शेतीची कल्पना नोकरीदरम्यानच आली. आम्हाला शेतकऱ्यांना जोडायचे होते, हे एक मोठे आव्हान होते. त्यांना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे होते. त्यासाठी ते दोघेही 6 महिने देशातील विविध राज्यात विशेषता गावात फिरले. वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन सेंद्रिय शेतीची संकल्पना समजून घेतली. इंटरनेटवर संशोधन केले. त्यातून ग्रोइंग चेंबर्सची कल्पना सुचली.

यावर्षी 100 एकर क्षेत्राचे उद्दिष्ट आहे- अभय आणि अमित यांनी सांगितले की, त्यांनी भिलवाडा येथे जमीन मालकाशी भागीदारी करून 1 एकरचे पॉलीहाऊस बांधले. त्यानंतर 2021 साली बुंदी येथील तळेरा आणि नांता येथे दोन पॉलीहाऊस तयार करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी शेतमालकासमवेत भागीदारी करून घेतली. आता त्यांनी पानिपतमध्ये 5 एकर, जयपूरमध्ये 3 एकर आणि कोटामध्ये 20 एकर जमिनीवर पॉलीहाऊस तयारीच्या कामाला सुरवात केली आहे. या वर्षाअखेरीस 100 एकरांवर पॉलीहाऊस बांधण्याची त्यांची योजना आहे.

6 महिने वेगवेगळ्या राज्यात फिरले - शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्न दुप्पट कसे करता येईल, यासाठी त्यांनी काम सुरू केले. या दोघांनी 6 महिने भारतातील विविध राज्याच्या शेकडो गावांतील शेतकऱ्यांना भेटून सेंद्रिय शेती समजून घेतली. शेती करताना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या, नेटवरून देखील माहिती गोळा केली. निश्चितच या दोघांनी शेतीमध्ये केलेला हा बदल आणि नोकरी सोडून शेती करण्याची दाखवलेली डेरिंग यामुळे त्यांना यश गवसल आहे.

English Summary: get risk and found success !! Quit jobs of Rs 20 lakh package and started farming; Today, the annual turnover is four crores
Published on: 30 April 2022, 10:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)