शेतीमध्ये कस राहिला नाही, शेती परवडत नाही असं आपण नेहमी म्हणत असतो. परंतु ज्याला खरंच शेती फुलवायची आहे, किंवा शेती करणे मनापासून आवडत त्याला त्याच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं. कारण हरियाणा राज्यातील शेतकऱ्याच्या यशोगथा ऐकल्यानंतर आपल्याला याची प्रचिती होणार होईल. करण्याला शेती फायद्याची असते हे वाक्य या शेतकऱ्याने करु दाखवले आहे. ही यशोगाथा हरियाणातील जरी असली तर शेती पद्धत आपल्याकडे वापरली जाते. आपल्या शेतात निरनिराळे प्रयोग करणारे अनिल कुमार हे सेंद्रिय शेती पद्धतीद्ववारे गव्हाचे उत्पादन घेतात.
हरियाणा राज्यातील इज्जर जिल्ह्यात असलेल्या ढाणा गावात अनिल कुमार राहतात. आपल्या शेतीत नवं-नवीन प्रयोग ते करत असतात. यामुळे शेती करण्यात त्यांचे मन लागते. अनिल कुमार यांच्या शेतात पिकलेल्या गव्हाला ४ हजार ते ५ हजार प्रति क्किंटल असा दर मिळतो. हा दर इतर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाला मिळत नाही. यामागे एक कारण आहे, अनिल कुमार हे गहूचे उत्पादन घेताना कोणत्याच प्रकारचे रासायनिक खते, औषधांची फवारणी करत नाहीत. यामुळे गहूचे दर ४ हजार ५ हजार प्रति क्किंटला मिळते. 'जर कोणी दुसरे शेतकरी रासायनिक खते, औषध फवारणी करुन २५ क्किंटल गव्हाचे उत्पन्न घेतात, तेव्हा मी १५ क्किंटल गव्हाचे उत्पन्न घेत असतो, यावरुन गव्हाचे दर निश्चित होत असते', असे अनिल कुमार म्हणाले.
जास्तीत जास्त प्रक्रिया करुन गव्हाची विक्री करावी. पीठ, दलिया, सूजी आदी सारख्या प्रक्रिया करुन गव्हाची विक्री केली जावी. यामुळे गव्हाला अधिकचा दर मिळत असतो. अनिल कुमार हे पैगंबरी सोना-मोती या वाणचे पेरणी करतात. साखरेची समस्य़ा असलेल्या व्यक्तींसाठी ह्या जातीच्या गव्हाचा फायदा होत असतो. आरोग्यासाठी या जातीचा गहू फायदेशीर आहे. यासह अनिल कुमार आपल्या शेतात सध्या ऊस, भाजीपालाचे उत्पादन घेत आहेत, यासह ते लेमन ग्रासचेही पीक घेत आहेत. पीकांना अधिक फायदा व्हावा, पिकांना भरपूर खनिज मिळावे, यासाठी अनिल कुमार यांनी नायट्रोजन उत्सर्जन करणारे वृक्ष आपल्या शेतात लावले आहेत. शेतकऱ्यांनी शेतात जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत, परंतु शेतकरी वृक्षांची तोड करत असतात आणि फार्म करत आहेत यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
एका एकरमधून मिळते अधिकचे उत्पन्न
याप्रकारे अनिल कुमार आपल्या एक एकर जमिनीतून एका वर्षात ४० हजार रुपयांची कमाई करतात. शेती करण्यासाठी आपण फक्त गावरान , देशी बियांणाचा उपयोग केला जातो, असे अनिल कुमार यांनी सांगितले. अनिल कुमार हे वेगवेळ्या प्रकराची शेती करतात. यात हंगामी पिकांचा समावेश आहे. अनिल आपल्या गावातील ६ एकर जमिनीत मिश्रित शेती करतात.
अनिल कुमार हे आता कापसाचे पीक घेणार आहेत, दर तिसऱ्या भागात हिरवे खते लावणार आहेत. या हंगामाची सर्व बिया हिरव्या खतात लावली जातात व पाणी दिले जाते. जेव्हा झाड दीड ते दीड फूटाचे होतील तेव्हा ते जमिनीत दाबले जातील. त्यानंतर, जेव्हा पहिला मान्सूनचा पाऊस पडेल, तेव्हा बाजरीची लागवड करतील. बाजरीसह, तुम्ही एका शेतात बाजरी आणि मूग आणि दुसर्या शेतात बाजरी आणि मिरचीची लागवड केली जाणार असल्याचे कुमार म्हणाले.
Published on: 12 May 2020, 11:45 IST