वाढत्या उन्हामुळे भाजीपाल तसेच हंगामी पिंकांची दरवाढ हि निश्चित असते. भाजीपाला ,कलिंगड, लिंबू या पिकांच्या दारात देखील वाढ होताना आपल्याला पाह्यला मिळाली आहे. या सोबतच गावरान काकडी सुद्धा चढ्या दराने विकली जात आहे, मुख्या पिकातून जो नफा शेतकर्यांना कमावता आला नाही तो आता हंगामी पिकातून शेतकरी कमावताना दिसतात, काकडी आरोग्यकारी सोबतच तिच्यात नैसर्गिक थंडपणा देखील असतो. या कारणामुळे बाजारात काकडीच्या मागणीत उन्हाळ्यात वाढ होते. सध्या काकडी तब्बल ५० रुपय प्रतिकिलो अशा भावाने विकली जात आहे. तसेच काकडी विकताना शेतकरीच स्वतः आपला माल विकताना दिसत आहे,
त्यामुळे पीक पध्दतीमधील बदलाबरोबर विक्रीमध्येही बदल करुन शेतकरी उत्पन्नात वाढ करीत असून. नांदेडच्या शेतकऱ्याचा हंगामी पिकांवर भर वाढत आहे.
कमी कालावधीत अधिक उत्पन्न हे हंगामी पिकाचे वैशिष्ट्य आहे. पण दरवर्षी पाण्याची निश्चितता नसते. त्यामुळे शेतकरी हे पीक पध्दतीमध्ये बदल करण्यास धजावत नाहीत. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने भर उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड, काकडी अशा हंगामी पिकांची लागवड केली होती.
याचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. नांदेडमध्ये यंदा प्रथमच काकडी क्षेत्रात वाढ झाली आहे.
काकडी सोबतच लिंबू देखील चढ्या भावात
तसेच उन्हाळ्यात सामान्य जनतेचे पेय आता अचानक महागल्या मुळे लिंबू पाणी पिणे सर्व सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर गेले आहे. राज्यात १२० ते १५० रुपयाने प्रती किलोने विकला जाणारा लिंबू आता १५० ते २०० रुपयाने विकला जात आहे. उन्हाळ्यात नेहमीच भाजी पाल्याच्या दरात वाढ होते
मात्र यावर्षी उष्णते सोबतच या वाढीला अनेक करणे असल्याचे व्यापारी म्हणतात. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे पेट्रोल डिझल दरांमध्ये झालेली वाढ, बदलते हवामन आणि अवकाळी पावसामुळे झालेले लिंबू उत्पादना वरील परिणाम हे आहेत. तसेच राज्य सोबत देशात देखील लिंबू ४०० रुपय प्रती किलो पर्यंत पोहोचला आहे. राजस्थानमध्ये अवघ्या २४ तसत ६० रुपयाने लिंबूचे दर वाढले होते. राजस्थानात मंगळवारी ३६० रुपय किलो असलेला लिंबू बुधवारी ४०० च्या घरात पोहोचला. काही भाजी विक्रीत्यांनी सांगितल्या प्रमाणे लिंबूचे उत्पादन या वर्षी कमी झाले, तसेह वाढते इंधन भाव आणि वाढती मागणी याला कारण आहे असे समजते.
Published on: 08 April 2022, 09:12 IST