बाळासाहेब मराळे
Agriculture News : गेल्या पंचवीस वर्षापासून सिन्नर तालु्क्यातील बाळासाहेब मराठे शेवगा पिकाची शेती करतात. त्यामध्ये विविध प्रयोग व संशोधनाचे काम ते करतात. वडील शेतकरी असले तरी माध्यमिक शाळेपर्यंत त्यांचा शेतीचा संबंध कधी आलाच नाही . १९९५ मध्ये आय.टी.आय झाल्यावर पुण्यात एका कंपनीत हंगामी कामगार म्हणून नोकरीला लागले. १९९८ मध्ये जागतिक मंदीमध्ये नोकरी गेली . असाच एकदा फिरत फिरत पुण्यातील गुलटेकडी मार्केट मध्ये गेले असता त्यांना तेथे तामिळनाडूतून ट्रकच्या ट्रक भरून आलेल्या शेवग्याच्या शेंगा पहिल्या. माझ्या घरच्या अंगणात शेवग्याचे एक झाड होत . त्याच्या शेंगा बाजारात कोणी विकत घेत नसत. तमिळनाडूतील शेतकरी पुण्यात शेवग्याचा शेंगा विकून चांगला नफा मिळवतात. मग आपल्या भागातील शेतकरी शेवगा लागवड का करीत नाही ? असा प्रश्न त्यांना पडला आणि शेवगा लागवड करण्याचा निर्णय घेतला. तर त्यांनी कशी शेवगा लागवड केली ते पाहुयात.
शेवगा पिकाच अर्थशास्त्र काय, एकरी किती उत्पन्न मिळत ? पाणी किती द्याव लागते. या विषयी त्यांनी आडतदारांकडून माहिती घेतली. मग केरळ, तामिळनाडू, कर्नाटकातील अनेक शेवगा उत्पादक व कृषी विद्यापीठांना भेटी दिल्या. चेन्नई परिसरातील एका शेतकऱ्याकडे १९९८ मध्ये तब्बल ४० एकर बागेत शेवगा शेती पहिली शेवग्याला मार्च, एप्रिल, मे मध्ये अजिबात पाणी मिळाले नाही तरी हे झाड मरत नाही . फक्त त्या कालावधीत शेंगा येत नाही. अशी माहिती मिळाली .
नाशिक जिल्ह्यात सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर वर शहा हे माझे गावं गावाचा परिसर अवर्षण ग्रस्त . उन्हाळ्यात प्यायलाहि पाणी मिळत नाही . आमच्या कुटुंबाची बारा एकर कोरडवाहू शेती . वडील पावसाच्या पाण्यावर बाजरी, मट, मुग, कुळीद अशी पारंपारिक पिके घ्यायची . वर्षेभर राबून पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळे. आई - वडील इतरांच्या शेतीवर मजुरीला जात. शेवगा शेती करण्याचा निर्णय घेतल्यावर मला सर्वांनी विरोध केला. मित्र व नातेवाईकांनी तर वेड्यातच काढले. पाणी आणि पैसा दोन्हीही नव्हते माझ्याकडे मात्र सर्वांचा विरोध झुगारून १९९९ मध्ये मुरबाड व खडकाळ जमिनीत मी शेवगा लावला.
प्रथम तीन एकरात शेवगा लागवड केली. सहा महिन्यांनी उत्पादन सुरु झाले. गावं परिसरातील आठवडे बाजारात पंचवीस – तीस रुपये किलोनी शेवगा विक्री केली . खर्च वजा जाता एकरी १ लाख १० हजार रुपये उत्पादन मिळाले घरातील माणसे खुश झाली. २००३ पासून माझ्या शेतीतील शेंगा निर्यातदारांमार्फात लंडन, पॅरिसच्या बाजारात निर्यात होऊ लागल्या. एकरी दोन ते अडीच लाखच वार्षिक उत्पन्न मिळू लागले.
निर्यातीचा अभ्यास व विविध प्रयोग करून २००५ मध्ये शेवग्याचा रोहित-१ हा नवीन विकसित केला . हे संशोधन तामिळनाडू कृषी विद्यापीठाने मान्य करून त्याला देशातील सर्वत्कृष्ठ शेवगा वान म्हणून २०१० मध्ये घोषित केले. रोहित - १ या वाणाची वैशिष्टे म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यात उत्पन्न मिळते. या वाणाला वर्षात दोन बहार येतात. शेंगांचा रंग गर्द हिरवा व लांबी मध्यम प्रतीची दीड ते दोन फुट असते. लागवडीपासून दहा ते बारा वर्षापर्यंत उत्पादन मिळते. हा बुटका वान असल्याने शेंगा सहज तोडता येतात. स्वादिष्ट चव अधिक उत्पादन क्षमता व निर्यातक्षम गुणधर्म या वैशिष्ट्यामुळे हे वान लोकप्रिय झाले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या वाणाच्या शेंगांची निर्यात करणे सुलभ झाले.
शेवगा शेंगाना वर्षभर ४० ते ६० रुपये किलोचे दर मिळतात . निर्यात होणाऱ्या शेंगाना याहून अधिक दर मिळतात . निर्यातीला १६० ते २०० रुपये पर्यंतचा दर मला मिळाला आहे. वार्षिक एकरी अडीच ते चार लाखापर्यंत वर्षाला उत्पन्न मिळते. मिळालेल्या उत्पादनातून शेतीसाठी आवश्यक सर्व सुविधांची उपलब्धता केली. जिल्ह्यातील व राज्यातील शेतकरी दररोज शेत पाहायला येतात. पंचवीस वर्षात जपान, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, श्रीलंका, अमेरिका या देश्यातील व इतर राज्यातील शेतकरी संशोधक शास्त्रज्ञ यानाही माझ्या शेतीला भेटी दिल्या आहेत. राज्य सरकारने २०१२ मध्ये अधिक आभ्यासासाठी मला जर्मनी, नेदरलंड, स्विझर्लंड, ऑस्ट्रेलिया या देशात जाऊन अधिक अभ्यास करण्याची संधी दिली.
यशस्वी शेतीच्या तंत्राबद्दल २०१४ मध्ये राज्यशासनाने कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले. शेवगा शेतीला शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, शेततळ्यात मच्छ पालन, , रोहित- १ शेवगा वाणाच्या रोपांची निर्मिती व विक्री हे जोड व्यवसाय करून टप्याटप्याने शेतीचे उत्पादन वाढत गेले. माझ्या या यशस्वी शेतीचे जिल्ह्यातील व राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अनुकरण केले. जपान मधील महिला शेतकरी साई याकोताकेच व विकीबो मिक्को यांनी २०१४ मध्ये माझ्या शेतीला भेट देत मार्गदर्शन घेतले . नंतर त्यांनी जपान मधील कुमोमितो प्रांतात ग्रीन हाउस मध्ये ८० एकर क्षेत्रात शेवगा लागवड केली .
दरम्यान, नवीन शेवगा लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना दर शनिवारी, रविवारी माझ्या शेतीवर शेवगा लागवड, विक्री कौशल्य व निर्यात या विषयी विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम गेल्या वीस वर्षापासून अखंड सुरु आहे . शेतात पैसा नाही असे बरच लोक म्हणतात पण माझा अनुभव निराला आहे . ज्या बारा एकर हलक्या - मुरमाड जमिनीतून वर्षाला पन्नास हजारांची वार्षिक उपन्न मिळत न्हवत त्याच जमिनीतून आता मला सात एकर शेवग्यातून वर्षाला १८ ते २५ लाखाच उत्पन्न मिळत आहे . अजूनही शेतीत विविध प्रयोग व संशोधन चालूच आहे
(बाळासाहेब मराळे, मु.पो.शहा, ता.सिन्नर जि. नाशिक (महारास्ट्र ) मो. ९८२२३१५६४१)
Published on: 11 October 2023, 03:38 IST