Success Stories

कोंबडीपालन हा किंवा पोल्ट्रीचा व्यवसाय शेतीसोबत केला जाणार जोडव्यवसाय. या व्यवसायातून शेतकऱ्यांना जबरदस्त आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मेहनती शेतकऱ्यांना कोंबडीपालनातून यश आल्याशिवाय राहत नाही, फक्त या व्यवसायात नियोजन अधिक महत्त्वाचं असते. आज अशीच एक कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ही कथा आहे,

Updated on 25 February, 2022 11:41 AM IST

कोंबडीपालन हा किंवा पोल्ट्रीचा व्यवसाय शेतीसोबत केला जाणार जोडव्यवसाय. या व्यवसायातून शेतकऱ्यांना जबरदस्त आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मेहनती शेतकऱ्यांना कोंबडीपालनातून यश आल्याशिवाय राहत नाही, फक्त या व्यवसायात नियोजन अधिक महत्त्वाचं असते. आज अशीच एक कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ही कथा आहे, पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची ज्यांनी कोंबडीपालनात आपला संसार फुलवला आहे.

पुण्यातील दौंड तालुक्यातील गार गावात राहणारे शिवाजी नांदखिले यांनी कोंबडीपालनातून आपलं आर्थिक गणित सुधारलं आहे. शिवाजी नांदखिले यांची वडिलोपार्जित एकत्रित कुटुंबाची 22 एकर शेती आहे. त्यातील 10 एकर जमिनीवर ते शेती करतात. यात बहुतांश ऊस, हंगामनिहाय कांदा, हरभरा, सूर्यफूल आदी पिके आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून 2016 मध्ये संकरित गायी पालन व दुग्ध व्यवसाय चालविला.

हेही वाचा : सांगलीच्या शेतकऱ्याला ढोबळी (शिमला) मिरचीनं दिलं सढळ उत्पन्न, एकरात घेतलं 53 टन उत्पन्न

गायींची खरेदी आणि गोठा बांधणी यासाठी सुमारे 20 लाखांची गुंतवणूक केली. दोन वर्ष व्यवसाय चालविला. दुधाला प्रति लिटर 17 रुपये दर मिळत होता. त्यामुळे व्यवसाय तोट्यात येऊ लागला. अखेर 2018 मध्ये तो व्यवसाय बंद करण्याचा निर्णय नांदखिले यांनी घेतला. भांडवली नुकसान देखील अनेक अडचणी आल्या. यात सुमारे एक लाखांचे नुकसान झाले.

पोल्ट्री व्यवसाय

शिवाजी सांगतात, दुधाचा व्यवसाय बंद झाल्यानंतर मी जेव्हा गोठ्यात पाऊल टाकायचो तेव्हा मन खिन्न होत असायचे. या जागेचा वापर करुन याचे उत्पन्नाचे साधन तयार करता येईल का याचा विचार करू लागलो.. त्यावेळी देशी कोंबडी पालनाचा व्यवसाय पुढे आला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचे चिरंजीव रविंद्र पाटील यांची 10 हजार पक्ष्यांची पोल्ट्री फार्म आहे. रविंद्र पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

 

व्यवसायाची वाटचाल

पहिल्या टप्प्यात केवळ 100 पिलांपासून व्यवसाय सुरू केला. टप्प्याटप्प्याने अंडी व पिले अशी संख्या वाढत गेली. त्यानंतर देशी जातीच्या एक हजार कोंबड्याची बॅच घेण्यास सुरुवात केली. नगर येथून पक्षी मागविले. गोठ्याचे रुपांतर केलेल्या १०० बाय १२ फूट आकाराच्या शेडमध्ये पोल्ट्रीसाठी आवश्यक पाणी आणि यंत्रणेची उभारणी केली आहे. एक दिवसांच्या पिलांची चांगली वाढ व संगोपन करुन सुमारे 90 दिवसांनंतर विक्री करण्यात येते. त्यावेळी पक्ष्यांचे वजन सव्वा किलोपर्यंत असते. चिकन व्यावसायिकांच्या सांगण्यावरुन नांदगाव येथून कावेरी जातीची ८०० पिले मागवून बॅच घेण्यात आली आहे. ब्रॉयलर पक्ष्यांच्या तुलनेत देशी पक्ष्यांचे व्यवस्थापन तुलनेते सोपे असल्याचे शिवाजी सांगतात. पक्ष्यांना वजन आणि मांसवाढीसाठी कोणतीही हार्मोस रुपी इंजेक्शन दिली जात नाहीत. तर कंपनीच्या खाद्यासह पाण्यातून विविध औषधांच्या मात्रा देण्यात येतात.

 

अर्थकारण

देशी कोंबड्यांना चिकन व्यावसायिक, हॉटेल, धाबेचालकांकडून मागणी आहे. खरेदीदार पोल्ट्रीवर येऊन खरेदी करतात.पुढे पुणे, मुंबईला विक्री केली जाते. काही किरकोळ विक्रेते देखील गरजेनुसार, स्वत येऊन खरेदी करतात. त्यांच्याकडून आठवड्यासाठी गरजेनुसार 50 तर ठोक खरेदीदार 300 पर्यंतच्या संख्येने करतात. तीन महिन्यांच्या व्यवस्थापनात प्रति पक्षी सगोपनाचा किमान खर्च 100 रुपये असतो. विक्री प्रति किलो 100 रुपयांच्या पुढे दराने होते. सध्या हा दर 150 रुपये आहे. दर कमी मिळाल्यास केवळ खर्च निघून जाण्याइतपत रक्कम हाती येते. चांगला दर राहिला तर साधरण एक हजार पक्ष्यांतून 25 ते 0 हजार रुपये उत्पन्न मिळते. शेती वा संसाराला त्याचा आधार होतो.

English Summary: From poultry farming to Savar, the world became a source income
Published on: 25 February 2022, 11:41 IST