भारत एक महापुरुषांची, साधुसंताची, पवित्र भूमी आहे. भारतात आईला देवाचाच दर्जा दिला गेला आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आईची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतो. अशीच एक माता-पुत्रांच्या प्रेमाची ही एक गोष्ट आहे. मध्यप्रदेशच्या शुजापूर जिल्ह्यात कालापीपल नावाचे एक छोटस गाव आहे. आणि ह्या गावात राहतात ललित परमार नावाचे सदगृहस्थ, ललित ह्यांनी मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेतले आहे पण त्यांचा शेतीकडे कल होता पण त्यांच्या गावात व आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांची समज होती की, शेती म्हणजे न परवडणारी गोष्ट आहे.
पण उच्च शिक्षित, सुशिक्षित असलेले ललित ह्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर शेतीत करण्याचा जणु मनाशी खूणगाठ बांधली. आणि ह्या गोष्टीला खरं वळण लाभले ते थोड्याशा दुःखापासून! त्याच झालं असं ललित ह्यांच्या मातोश्री ह्या डायबिटीक पेशन्ट आहेत आणि ललित त्यांच्या आरोग्यासाठी चांगले पौष्टिक आहार शोधत होते. आणि अशातच ललित ह्यांना कोणीतरी सांगितले की काळा गहु हा आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतो आणि विशेष करून डायबेटीक पेशंटसाठी खुप उपयुक्त असतो कारण ह्या गव्हात साखरेचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे ललित ह्यांनी ह्या काळ्या गव्हाची लागवड करण्याचे ठरवले आणि ह्यासाठी त्यांनी रिसर्च करायला सुरवात केली आणि त्याचे हे रिसर्च त्यांना राष्ट्रीय कृषी अन्न जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र मोहाली पंजाबला घेऊन गेले. आणि काळ्या गव्हाची लागवड कशी करावी हे ललित ह्यांनी येथून शिकले.
हेही वाचा -ऑफर! शेतकरी मित्रांनो हवंय का होम लोन? मग 'ह्या' बँकात करा अँप्लाय होमलोनसाठी स्वस्त केले व्याजदर
यारांना आवडला गहु म्हणुन ऑल इंडिया सप्लाय…
ललित ह्यांच्याकडे काळ्या गव्हाची मागणी ही प्रचंड वाढली. काळ्या गव्हाच्या आयुर्वेदिक गुणांमुळे, पौष्टिकतेमुळे व चवीमुळे ह्याची इतकी मागणी वाढली की यावेळी ललितने तब्बल 10 एकर क्षेत्रात काळ्या गव्हाची पेरणी केली. ललित ह्यांनी हा काळा गहू भोपाळला आपल्या मित्रांनाही पाठवला होता. मित्रांना गहू खुपच आवडला आणि त्यामुळे मित्रांनी त्याची संपुर्ण देशभरात विक्री केली.
त्यामुळे मार्केट मध्ये गहु विकण्याऐवजी ललित ह्यांना थेट ऑर्डर भेटायला लागली आणि त्यामुळे ललित ह्यांचा अतिरिक्त फायदा झाला आणि ग्राहकांनाही चांगल्या प्रतीचा गहु मिळाला. ललित ह्यांना ज्या शेतातून माफक उत्पन्न मिळत होते, आता त्याच शेतातून त्यांना प्रचंड उत्पन्न मिळू लागले आहे.
Published on: 04 October 2021, 10:04 IST